Crop Insurance agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक आता ग्रामपंचायतीत लावणार

Crop Insurance Company : गेल्या वर्षीपासून राज्यात एक रुपयात पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेत लाभार्थ्यांची संख्या वाढती असली, तरी भरपाईच्या वेळी मात्र विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : नैसर्गिक आपत्तीकाळात भरपाईच्या वेळी विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्या वेळी कोणाशी संपर्क साधावा, याविषयी माहिती नसल्याने शेतकरी हतबल होतात.

त्यावर उपाय म्हणून (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत असलेल्या गावांमधील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर विमा प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षीपासून राज्यात एक रुपयात पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेत लाभार्थ्यांची संख्या वाढती असली, तरी भरपाईच्या वेळी मात्र विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कायद्यातील तरतुदींचा फायदा घेत शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवले जाते, असा अनुभव आहे.

हतबल शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे वारंवार जात त्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवीत भरपाईची अपेक्षा करतात. मात्र हा प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील असल्याने त्यांच्या समस्येचे समाधान करणे कृषी अधिकाऱ्यांना शक्‍य होत नाही. यातूनच शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य वाढीस लागते. विमा प्रतिनिधींचे संपर्क क्रमांकही उपलब्ध नसतात.

संपर्क क्रमांक उपलब्ध असले तर अनेकदा स्वीच ऑफ येतात, असाही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या सर्वांवर उपाय म्हणून आता थेट विमा कंपनी प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांकच ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करण्याची अनोखी मोहीम (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनमधून हाती घेण्यात आली आहे.

मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे हे त्यासाठी आग्रही असून, तशा सूचना मिशनअंतर्गत असलेल्या आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.

दरवर्षी विमा भरपाईचा मुद्दा ऐरणीवर राहतो. भरपाई न मिळालेले शेतकरी सैरभैर होतात. त्यावर उपाय म्हणून विमा प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक ग्रामपंचायत स्तरावर उपलब्धतेची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे. याचे सकारात्मक परिणाम होतील, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात या उपक्रमाच्या अंमलबजावणीला गती दिली आहे.
- ॲड. नीलेश हेलोंडे, अध्यक्ष, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT