Crop Insurance : पीकविमा मदतीच्या मुद्यावर कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन

Crop Insurance Compensation : गहू व हरभऱ्याच्या नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत कमी मिळाल्याने शेतकरी विमा कंपनीविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Akola News : गहू व हरभऱ्याच्या नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत कमी मिळाल्याने शेतकरी विमा कंपनीविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत. पीकविमा काढणाऱ्यांना पुरेशा प्रमाणात भरपाई दिली जावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात शेतकऱ्यांनी ठाण मांडले होते.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : संभाजीनगरनंतर अकोल्यात शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून थट्टा

याबाबत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी माहिती दिली, की जिल्ह्यात गहू, हरभरा पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत विमा कंपनीने दिली आहे. दोनशे रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत अनेकांना ही मदत जमा झाली. काही शेतकऱ्यांना मदतही मिळाली नाही. पीक नुकसानाची भरपाई नव्या नियमानुसार काढली जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Crop Insurance
Crop Insurance : विमा कंपनीने एकाच दिवशी दिलेल्या माहितीत तफावत

या मुद्यावर काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला निवेदनसुद्धा देण्यात आले होते. मात्र, त्यावर समाधानकारक तोडगा न काढल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पीक नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवले होते. यापोटी झालेल्या सर्वेक्षणादरम्यान सर्वेक्षकांनी कोऱ्या अर्जांवर स्वाक्षऱ्या घेतल्याची बाबही तेव्हा शेतकऱ्यांनी उघडकीस आणली होती.

त्यानंतर आता जेव्हा मदत खात्यात दिली गेली तेव्हा शेतकऱ्यांना दोनशे रुपयांपासून मदत मिळाली. ही शेतकऱ्यांची एकप्रकारे हेळसांड आहे. प्रशासनाने विमा कंपनीला निर्देश देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सन्मानजनक योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी दहिगाव गावंडे व परिसरातील शेतकरी सहभागी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com