Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

IMD Weather Alert : हूश्श... महाराष्ट्र सोडून देशातील १३ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या महिन्याभरापासून देशातील उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. येथे थंडीवाढल्याने दाट धुके देखील पडत आहे. ज्याचा परिणाम सार्वजनिक वाहतूकीवर होत आहे. यादरम्यान हवामान विभागाने अलर्ट जारी करताना देशातील १३ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ज्यामुळे आधीच संकंटात सापडलेला शेतकरी चिंतातूर झाला आहे. पण या इशाऱ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. कारण हा इशारा महाराष्ट्र सोडून इतर १३ राज्यांना देण्यात आला आहे. तर राज्यातील तापमानात पुढील काही दिवसात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील काही दिवसापासून देशभरातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. ज्यामुळे अवकाळी पाठोपाठ आता थंडीचा जोर वाढल्याचे दिसत आहे. नाशिकच्या निफाडमध्ये गेल्या काही दिवसापासून ९ सेल्सिअसच्या खाली तापमान नोंदवले गेले आहे. याचे कारण जम्मू आणि काश्मिरमध्ये होणारी बर्फ वृष्टी असून यामुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहेत. याचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये जाणवू लागलेला आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भात याचा परिणाम अधिक प्रमाणात दिसत असून येथे बोचणारी थंडी पडली आहे.

अवकाळी पावसाची दाट शक्यता

दरम्यान अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने IMD ने ३१ जानेवारी २०२४ ते २ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये १३ राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, जम्मू कश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश, चंदिगडमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.

पावसाची शक्यता

तसेच पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, आसाम, ओडिसा या राज्यात तापमानात घट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या भागात थंडीची लाट येईल असेही अंदाजात म्हटले आहे. तर अंदमान आणि निकोबारमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच तमिळनाडू, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र वगळून इशारा

दरम्यान महाराष्ट्रात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत आहे. दरम्यान हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण झाल्याने अनेक शेतकरी डोक्याला हात लावून बसले आहेत. मात्र या वेळी हवामान खात्याने दिलेला इशारा महाराष्ट्र वगळून आहे.

थंडीची लाट वाढणार?

तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट थोडीफार वाढू शकते असा अंदाज देण्यात आला आहे. तर नाशिक वगळता इतर जिल्ह्यात सकाळचे तापमान सरासरी १० ते १४ डिग्री सेल्सिअस पाहायला मिळेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोणतेही पावसाचा अंदाज नाहीत. तर सध्या ढगाळ ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात वाढ झालेली दिसत आहे. त्यात पुढील तीन दिवस आणखी वाढ वाढ होणार असून थंडी कमी होईल असेही या अंदाजात म्हटलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT