Farmer Relief: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांपर्यंत पोहोचल्याने शेती पिकांना पाण्याची तीव्र गरज भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ३० जूनपर्यंत म्हणजेच सलग १२० दिवस हा कालवा सुरू राहणार आहे..माळशिरस तालुक्यात गत हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी अतिवृष्टीमुळे पाणी जमीनीत न मुरता वाहून गेले. परिणामी, भूगर्भातील पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. उन्हाळ्याची चाहूल लागताच विहिरींची पाणीपातळी ४ ते ५ फुटांनी खाली गेल्याने पिके करपण्याची भीती व्यक्त होत होती..त्यातच जमिनीला विसावा न देता लागोपाठ पिके घेण्याचे प्रमाण वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. ही गरज ओळखून प्रशासनाने पाणी सोडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. नीरा उजवा कालव्याचे हे उन्हाळी आवर्तन ३ मार्चपासून सुरू झाले असून ३० जूनपर्यंत चालणार आहे..या हंगामातील पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मागील थकबाकी आणि चालू पाणीपट्टी भरून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे, तसेच आपली पाण्याची मागणी नोंदवावी, असे आवाहन सहायक अभियंता नहार यांनी केले आहे..माळशिरसला पाणी पुरवणाऱ्या धरणांमधील सद्यःस्थितीभाटघर धरण : ६७.४ टक्केनीरा देवघर धरण : ६४.९७ टक्केवीर धरण : ५४.३३ टक्केगुंजवणी धरण : ६४.३४ टक्के(एकूण सरासरी साठा : ६३.८६ टक्के).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.