Weather Update : मुसळधार पावसाचा इशारा

मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान (Favorable Weather Condition For Rain) असल्याने राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस (Heavy Rain Forecast With Lightning) कोसळत आहे. आज (ता. ९) दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Heavy Rain Orange Alert) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Heavy Rain
Rain Update : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आला असून, हा पट्टा जैसलमेर, भोपाळ, गोंदिया जगदलपूर, कलिंगापट्टणम, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व- मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण कोकणापासून उपसागरातील कमी दाब प्रणाली पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.

दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत आहे. अनेक भागात तर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. आज (ता. ९) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा, तसेच उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. उद्यापर्यंत (ता. १०) ही प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत असून, किनाऱ्याकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

(ऑरेंज अलर्ट)

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा

(येलो अलर्ट)

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा

(येलो अलर्ट) :

कोकण : पालघर ठाणे, मुंबई.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com