Farmer Agitation  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Agitation : ‘शक्तिपीठ’मुळे शेतकऱ्यांची जीवनयात्रा कठीण

Farmer Issue : शक्तिपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा, या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने मंगळवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Dharashiv News : शक्तिपीठ महामार्गामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या अनेकांची जीवनयात्रा थांबून त्यांना जीवन जगणे कठीण होणार आहे. यामुळे हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा, या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने मंगळवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलनानंतर समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना मागण्यांचे निवेदन दिले. महामार्गामुळे मराठवाड्यातील चांगल्या जमिनी संपादित होऊन त्यावर उपजीविका करणारी हजारो कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. या भागातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेती व्यवसायाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने जमिनीच्या मावेजातून मिळालेली रक्कमही नुकसान देणारी ठरणार आहे.

शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. शेतकरी भूमिहीन होऊन त्यांना गाव सोडून दुसरीकडे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांचे जीवन अस्थिर करणाऱ्या या महामार्गाची गरज नसताना उभारणी करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे हा महामार्ग रद्द करावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या वेळी आमदार पाटील व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनामागील भूमिका मांडली.

आंदोलनात समितीचे अॅड. अविनाश देशमुख, संभाजी फरताडे, सुदर्शन पडवळ, डॉ. सिद्धेश्वर जाधव, अभिजीत देशमुख, सुनील भोसले, सुजित झांबरे, गणेश एडके, राहुल कदम, पवन देशपांडे, अजित जाधव, हरी भिंगडे, सुरेखा यादव यांच्यासह शेतकऱ्यांनी भाग घेतला. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी आंदोलनात सहभाग होऊन पाठिंबा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT