Farmer Agitation : ‘अग्रणी’त पाणी सोडा, अन्यथा कर्नाटकात जाऊ

Water Issue : घाटमाथ्यावर टेंभू सिंचन योजना वाहत असूनही घाटमाथ्यावरील गावे कोरडी आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात म्हैसाळ व टेंभू योजना सुरू असून तालुक्यातील काही गावांना लाभ होत नाही. त्यामुळे नदीकाठचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करत आहेत.
Agrani River
Agrani RiverAgrowon
Published on
Updated on

Sangli News : कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनेचे पाणी दाखल झाल्याने कालवा दुथडी भरून वाहत आहे. या पार्श्‍वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्याची जीवनवाहिनी अग्रणी नदी मात्र कोरडी पडली आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी नदीकाठचे शेतकरी संतप्त झाले आहेत.

Agrani River
Water Stock : नायगावच्या तलावात ३५ टक्केच साठा

घाटमाथ्यावर टेंभू सिंचन योजना वाहत असूनही घाटमाथ्यावरील गावे कोरडी आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात म्हैसाळ व टेंभू योजना सुरू असून तालुक्यातील काही गावांना लाभ होत नाही. त्यामुळे नदीकाठचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करत आहेत. नदी खोऱ्याच्या पट्ट्यात मळणगाव, शिरढोण, मोरगाव, विठूरायाची वाडी, हिंगणगाव, अग्रण धुळगाव, लोणारवाडी ही गावे आहेत.

या गावांतून वाहणारी अग्रणी नदी कित्येक दिवसांपासून कोरडी असल्याने संबंधित गावांचा पाणीप्रश्न गंभीर आहे. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही. म्हैसाळ व टेंभू या योजना ‘असून अडचन नसून खोळंबा’ ठरल्या आहेत. नदी बारमाही वाहिल्यास तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावे दुष्काळमुक्त होतील.

Agrani River
Water Issue : धामणी नदीपात्रात पाण्यासाठी जेसीबीद्वारे पाडले खड्डे

याशिवाय, हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येईल आणि पिण्यासह शेती-जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचाच मिटणार आहे. अग्रणी नदी सतत प्रवाहित झाल्यास शेतकरी पारंपरिक शेतीव्यवसायात बदल करून तो फळशेती, फूलशेतीसह भाजीपाल्याचा व्यवसाय देखील ‘हायटेक’ करेल. त्यातून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.

अग्रणी नदीकाठावरील सर्वांत मोठे हिंगणगाव आहे. येथील लोकसंख्या, क्षेत्रफळ देखील अधिक आहे. ग्रामस्थांचा प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आहे. ही शेती केवळ पाण्यावर अवलंबून आहे. तेव्हा पाटबंधारे विभागाला अग्रणी नदीमध्ये पाणी सोडण्याची वारंवार मागणी केली. मात्र संबंधित अधिकारी कानाडोळा करत आहेत. येत्या काही दिवसांत पाणी सोडले नाही तर आम्ही हिंगणगावकर आंदोलन करणार आहोत.
प्रिया सावळे, सरपंच हिंगणगाव
काही दिवसांपूर्वी ‘म्हैसाळ’चे पाणी अग्रणी नदीत सोडले होते. मात्र हिंगणगावपासून पुढे सरकले नाही. ‘म्हैसाळ’चे पाणी धुळगावमधील बंधारे भरून मिळावेत, धुळगावला पाणी द्यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले. मात्र त्याची दखल न घेतल्याने सदस्य, ग्रामस्थांनी शुक्रवारी अग्रणी नदीमध्ये अर्धनग्न आंदोलन केले. तेव्हा ‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले.
शिवदास भोसले, सरपंच, अग्रण धूळगाव
महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडी हे छोटेसे गाव आहे. आजपर्यंत गावाने दुष्काळाच्या झळा खूप सोसल्या आहेत. ‘अग्रणी’त पाणी सोडा, अन्यथा कर्नाटकात सामील होण्यासाठी परवानगी द्या.
अजित खोत, सरपंच, लोणारवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com