Shaktipith Mahamarg : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफांचा सरकारला घरचा आहेर, जनआंदोलन उभारण्याचा इशारा

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही या महामार्गाला विरोध दर्शवत जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
Shaktipith Mahamarg
Shaktipith Mahamargagrowon
Published on
Updated on

Shaktipith Mahamarg In Kolhapur : गोवा ते नागपूर असा शक्तिपीठ महामार्गाचा सरकारकडून घाट घालण्यात येत आहे. दरम्यान या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असूनही प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नोटीसा देत महामार्गसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान यावर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत अधिकाऱ्यांना हाकलून लावलं आहे.

१ हजार २०० हेक्टर एका कोल्हापूर जिल्ह्यातून शेतजमीन जाणार असल्याने याविरोधात १८ जूनला भव्य मोर्च्याचेही आयोजन करण्यात आले आहे. यावर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही या महामार्गाला विरोध दर्शवत जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यातील सुमारे ४० गावांमधून जातो. या महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचे संकट आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्दच करावा लागणार आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा हा महामार्ग रद्द होण्यासाठी प्रसंगी सर्वपक्षीय व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल, अशा भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल(ता.११) पत्रकाद्वारे व्यक्त केल्या.

पत्रकात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निकालाबाबत कारणमीमांसा करण्यासाठी मुंबईत पक्षाची बैठक घेतली होती. त्यामध्ये शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या नाराजी व संतापाला सामोरे जावे लागण्याचे प्रमुख कारण आपण स्पष्ट केले. ही बाब उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही निदर्शनास आणून दिली.

Shaktipith Mahamarg
Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी

दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूरवरून सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही. दरम्यान, माजी खासदार संजय मंडलिक यांनीही मुंबईत झालेल्या शिवसेना- शिंदे गटाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयी चर्चा केली आहे.

पर्यायी महामार्गही नकोच

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे आधीपासूनच अधिक मजबूत आहे. त्यामुळे या नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. तसेच हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करून पर्यायी मार्ग करा, असे म्हणणेही संयुक्तिक आणि योग्य नाही. प्रसंगी कोणतीही किंमत मोजून हा महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com