Majalgaon Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Majalgaon Dam : माजलगाव धरणाची पातळी निम्म्यापुढे पोचली

Dam Water Storage : जायकवाडी धरणाचा दुसरा टप्पा म्हणून माजलगाव धरणाची ओळख आहे. हे धरण मागील वर्षी पावसाअभावी भरले नाही.

Team Agrowon

Majalgaon News : मागील वर्षी पावसाअभावी माजलगाव धरण मृतसाठ्यात गेले होते. परंतु यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसावर आणि जायकवाडी धरणातून येत असलेल्या पाण्यामुळे माजलगाव धरण ५० टक्के भरले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर पाण्याची चिंता मिटली आहे.

जायकवाडी धरणाचा दुसरा टप्पा म्हणून माजलगाव धरणाची ओळख आहे. हे धरण मागील वर्षी पावसाअभावी भरले नाही. त्यामुळे तालुक्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता तर ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती.

धरणातून ११ पुनर्वसीत गावे बीड व माजलगाव शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. दरम्यान, धरण कार्यक्षेत्रात होत असलेल्या पावसावर आणि जायकवाडी धरणातून कॅनॉलद्वारे माजलगाव धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

त्यामुळे माजलगाव धरण ५० टक्के भरले आहे. माजलगाव धरण कार्यक्षेत्रामध्ये पाण्याची आवक सुरू असून मोठा पाऊस झाल्यास निश्चितच माजलगाव धरण १०० टक्के भरेल अशी आशा आहे.

धरण सद्यस्थिती

 उपलब्ध पाणीसाठा - २९७ दलघमी

 पाणी पातळी - ४२९.५० मीटर

 एकूण टक्केवारी - ५०.४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Administration Plan: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज

Paddy Prices Drop: मळणीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचा डाव

Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’ला पाठिंबा, पण मोबदला दहा पट द्या !

Kharif Sowing Planning: वर्ध्यात ४.१९ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

Shirapur Irrigation Project: शिरापूर योजनेच्या कामाची गती संथ

SCROLL FOR NEXT