Dam Water Stock : पुणे जिल्ह्यातील धरणे तुडूंब

Pune Dam Water Level Update : पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी आत्तापर्यंत जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली असून अवघ्या तीन धरणांत ८० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
Dam
DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : पावसाळ्याचे जवळपास सव्वा तीन महिने पूर्ण होत आले आहे. या कालावधीत कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला आहे. विशेषतः हा धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी आत्तापर्यंत जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली असून अवघ्या तीन धरणांत ८० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ही सर्व धरणे मिळून १९८.३२ टीएमसीपैकी १९५.९९ टीएमसी म्हणजेच ९८ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

यंदा जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे चालू वर्षी पुरेसा पडतो की नाही, अशी स्थिती झाली होती. परंतु सात जूनच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानंतर आठ जूनपासून जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १५ जूनपर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाला असून ३० जूनपर्यंत पावसाचे कमी-अधिक प्रमाण होते. परंतु जुलैमध्ये पावसाने चांगलाच जोर लावून धरला.

Dam
Koyna Dam Water : कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील भात खाचरे भरून वाहू लागल्याने धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू झाली. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

ऑगस्टमध्येपावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी अखेरच्या दोन आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. या धरणातून कमी-अधिक प्रमाणात डाव्या व उजव्या कालव्याला व विद्युतगृहासाठी आणि सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणांत १३२.४० टीएमसी म्हणजेच ६६ टक्के एवढा पाणीसाठा झाला होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी मागील आठवड्यात जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. तर एक जून पासून मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांत ७९.९४ टीएमसी एवढा पाणीसाठा नव्याने दाखल झाला आहे.

Dam
Dam Water Storage : ‘येलदरी’त ५३.०१ टक्के, तर ‘निम्न दुधना’त ७०.८५ टक्केवर पाणीसाठा

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांत नव्याने १२५.६३ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड या धरणांत नव्याने ६७.९३ टीएमसी, याशिवाय उजनी १८४.८३ टीएमसी, मुळशी ३६.१७ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील काही धरणे भरली असून उर्वरित काही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. काही धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने मुठा, पवना, भीमा, आरळा, इंद्रायणी, कानंदी, कुकडी, मीना, कुकडी, घोड या नद्या दुथडी भरून वाहिल्या असून आता या नद्यांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे.

रविवारी (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला धरणक्षेत्रनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर १५, वरसगाव ५, पानशेत ६, खडकवासला १, पवना १७, कळमोडी २, भामा आसखेड १, आंध्रा ४, नाझरे २, गुंजवणी ५, भाटघर ७, निरा देवघर २६, पिंपळगाव जोगे ६, माणिकडोह ९, वडज २, डिंभे १, चिल्हेवाडी ३, मुळशी २८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com