Fodder Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : धुळ्यात चारा-पाण्याचा प्रश्‍न बनतोय गंभीर

Water and Fodder Issue : दुष्काळामुळे हिरवा चारा महागला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना फटका बसत आहे. पावसाअभावी मका, बाजरी व इतर पिके करपल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा चाराही लागला नाही, यामुळे महाग चारा घ्यावा लागत असून, टंचाईदेखील वाढत आहे.

Team Agrowon

Dhule News : दुष्काळामुळे हिरवा चारा महागला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना फटका बसत आहे. पावसाअभावी मका, बाजरी व इतर पिके करपल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा चाराही लागला नाही, यामुळे महाग चारा घ्यावा लागत असून, टंचाईदेखील वाढत आहे.

जिल्ह्यात २०२३ च्या पावसाळ्यात एकूण ४३३.७ मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या ८१.०५ टक्के इतका पाऊस झाला. जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी १९८.८१ दलघमी (४०.८६ टक्के) जलसाठा शिल्लक होता. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी आजअखेर ८५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील डाबली, धावडे, रहीमपुरे व धुळे तालुक्यांतील तिसगाव, वडेल येथे एकूण पाच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. तसेच धुळे, साक्री, शिरपूर या तीन तालुक्यांतील एकूण २८ महसूल मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने तसेच पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याकामी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही केली असून, बैठकाही घेतल्या आहेत.

अन्य भागातून आणावा लागतो चारा

दुसऱ्या भागातून किंवा तालुक्यांमधून चाऱ्याची वाहतूक करून शेतकरी आता जनावरांना जगवतो आहे; परंतु गाय, म्हैस, गीर गायी आदींना हिरवा चारा लागतो. दिवसभरात गायीला सरासरी ४० किलो चारा लागतो. तसेच म्हशीला सरासरी ५० किलो चारा लागतो. चार ते पाच रुपये किलोप्रमाणे हा चारा मिळत असल्याने एका दिवसाला सरासरी १६० ते २०० रुपयांपर्यंत खर्च शेतकऱ्यांना येतो. त्यावर उपाय म्हणून मुरघास बॅगमध्ये हिरव्या चाऱ्याचे तुकडे करून साठविला आहे. एक, तीन व पाच टनाची एक बॅग असल्याने चारा साठविणे शक्य होत आहे.

टँकरचीही दरवाढ शक्य

ग्रामीण भागात सद्यःस्थितीला जनावरांना चाऱ्यापेक्षा पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. चारा दुसऱ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून विकत आणणे शक्य आहे; परंतु पाणी मिळणे अवघड होत असल्याने टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागते. पाच हजार लिटरच्या टँकरसाठी पंधराशे रुपये खर्च करावे लागतात. टँकरचे दर अजूनही वाढतील, असा अंदाज आहे. प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. परंतु ते पुरेसे नाहीत. त्यांची संख्या कमी आहे, अशीही नाराजी आहे. दूध उत्पादक, मोठ्या कुटुंबांना काही गावांत टँकरने पाणी आणावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT