Fodder Ban : कडब्यावरील जिल्हाबंदीने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

Farmer Issue : शासनाने दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाई होऊ नये म्हणून कडब्यावर घातलेली जिल्हाबंदीची अट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असून, सध्या शिवारातील कडबा जसाच्या तसा पडून आहे.
Fodder
FodderAgrowon

Mangalvedha News : शासनाने दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाई होऊ नये म्हणून कडब्यावर घातलेली जिल्हाबंदीची अट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असून, सध्या शिवारातील कडबा जसाच्या तसा पडून आहे. वादळी पावसात कडब्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाचा कडबाबंदीचा आदेश शेतकऱ्यांसाठी जाचक ठरवू लागला आहे.

मंगळवेढा शिवारात मंगळवेढा, ब्रह्मपुरी, मुंडेवाडी, बोराळे, भालेवाडी, फटेवाडी या शिवारात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा ज्वारी मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे. सुरुवातीला सात हजार रुपये प्रतिक्विंटल असलेली ज्वारी, नव्या ज्वारीचे बाजारात आगमन होताच ३५०० रुपये प्रतिक्विंटल विकली जाऊ लागली.

Fodder
Animal Fodder : पाण्याअभावी ओला चारा वाढलाच नाही, जनावरांच्या ओल्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

त्यामुळे ज्वारीला अपेक्षित हमीभाव नाही. रब्बी पेरणीपूर्वी काही शेतकऱ्यांनी बँका व व्यापाऱ्यांकडून उचल घेऊन पेरणी केली. त्या शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च हा ज्वारी विकल्यावर भागवला जाऊ शकतो, अशा शेतकऱ्यांनी मिळेल त्या दराने विकण्याचा प्रयत्न केला. काही शेतकऱ्यांची ज्वारी कवडीमोल किमतीने व्यापाऱ्यांनी खरेदी केली.

कडबा विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो; मात्र शिवारामध्ये असलेला कडबा तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे कौटुंबिक बजेट देखील कोलमडले आहे. शासनाने चाराटंचाई निर्माण होऊ नये म्हणून कडब्याला आंतरजिल्हा बंदी घातली. या बंदीमुळे कडब्याला अपेक्षित ग्राहक नाही.

Fodder
Fodder Shortage : नगर जिल्ह्यात मेच्या मध्यापर्यंतच चारा उपलब्ध

दरवर्षी २० ते २५ रुपये विकणारी पेंडी सध्या दहा रुपयांपेक्षा कमी दराने विकली जात आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे कडबाबंदीने कंबरडे मोडले. त्यात दोन दिवसातील वादळामुळे कडबा उडून गेला तर काही शेतकऱ्यांचा कडबा चोरीस देखील गेला. नामदेव आवताडे या शेतकऱ्याच्या कडब्याच्या गंजीवर वीज पडून त्या शेतकऱ्याच्या जवळपास पाच हजार पेंडी कडबा जळून खाक झाला. अशा परिस्थितीत वादळी पावसात नुकसान झालेल्या कडब्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिल्हाबंदीने शेतकऱ्यांचा कडबा शिवारात पडून आहे. नुकसान झालेल्या कडब्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे व जिल्हाबंदीचा आदेश मागे घेऊन कडबा विक्रीला परवानगी द्यावी. याबाबतची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
अजित जगताप, माजी नगरसेवक, मंगळवेढा नगर परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com