Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought 2024 : दुष्काळी उपाययोजनेची मुद्दा प्रचारात आणला नाही

Drought Update : वडील घराच्या गाईला (जनावरांना) सोयाबीनचे भुस्कट हा चारा जनावरांना देत होते. अनेक पशुपालक चालू वर्षी दुष्काळी संकटातून वेळ काढून नेण्यासाठी, घराच्या जनावरांना सोयाबीनचे भुस्कट चारा म्हणून दिला जातो.

डॉ. सोमिनाथ घोळवे

Drought Condition : वडील घराच्या गाईला (जनावरांना) सोयाबीनचे भुस्कट हा चारा जनावरांना देत होते. अनेक पशुपालक चालू वर्षी दुष्काळी संकटातून वेळ काढून नेण्यासाठी, घराच्या जनावरांना सोयाबीनचे भुस्कट चारा म्हणून दिला जातो. मात्र मला प्रश्न पडला की सोयाबीनचे भुस्कट हा चारा होऊ शकतो का? उन्हाचे दिवस, ४० पेक्षा जास्त तपमान. त्यात असे गरम असणारे सोयाबीनचे भुस्कट जनावरांना चारा म्हणून दिला जातो.

अशा रखरखत्या उन्हात आणि गरम वातावरणात जनावरांनी जर सोयाबीन भुस्कट जास्तीचे खाल्ले तर पोटामध्ये गॅस तयार होतो. त्यामुळे पचनक्रिया बिघडते. लगेच डॉक्टर दाखवावे लागते. म्हणजे १/२ हजार रुपयांना भुर्दंड आला. त्यामुळे मर्यादित सोयाबीन भुस्कट चारा म्हणून जनावरांना द्यावे लागते. चारा बदल करावा लागतो.

जनावर गाबन असेल तर गर्भपात होण्याची शक्यता निर्माण होते. पण चारा कमतरता असल्याने हे सोयाबीन भुस्कट जनावरांना द्यावे लागते. सोयाबीनच्या भुस्कटाप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी तुर, मूग, ज्वारी, हरभरा व इतर पिकांचे भुस्कट चारा म्हणून वापरले. ज्याच्याकडे हेही उपलब्ध नव्हते, त्यांनी जनावरांना विकत घेऊन टाकले किंवा जनावरे विकली.

सोयाबीन भूस्कट जनावरांना कसदार आहे का ? हे माहीत नाही. त्या संदर्भातील ज्या चाचण्या (टेस्ट) होणे आवश्यक आहे, त्या टेस्ट झालेल्या नाहीत. मुळात सोयाबीन काढायला येते, त्यावेळी पूर्ण पाला गळून गेलेला असतो. केवळ शेंगा आणि काड शिल्लक राहते. झाडाचे काड देखील कठीण असते. मशीनमध्ये सोयाबीन मळताना काडाचा भुगा होऊन येतो. थोडाफार पाला असेल तर तोही मशीनचा फुकऱ्याने दूर जाऊन पडतो. तो पुन्हा भूस्कटमध्ये येत नाही. त्यामुळे शेंगाची वरचे कव्हर (टरकाळी) आणि झाडाची लाकडे (काड) शिल्लक राहते. ते या दुष्काळात जनावरांना खायला घालत आहेत.

चालू वर्षातील चारा प्रश्न खूप गंभीर होता. तो पशुपालकांनी कसा निभवला असेल ? चारा छावणी नाही. चारा डेपो नाही. चारा वाटप किंवा चारा पुरवठा करण्यात आला नाही. " चारा छावणी किंवा चारा पुरवठा" दुष्काळी उपाययोजनेतील मूलभूत उपाययोजना आहे. मात्र याकडे धुकुणही पाहिले नाही. निवडणुकीच्या पुढे दुष्काळ आहे हे राजकीय नेतृत्व विसरले. ऐवढेच नाही तर निवडणूक प्रचारात देखील दुष्काळी उपाययोजनेची मुद्दा प्रचारात आणला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ration Card e-KYC : दोन लाख ८७ हजारांवर लाभार्थी स्वस्त धान्यास मुकण्याची शक्यता

Boragaon Anjanpur Barrage : बोरगाव-अंजनपूर बॅरेजेच्या दुरुस्तीला चौदा कोटी

Sugarcane Crushing Season : कर्नाटकात जाणाऱ्या उसाबाबत तोडगा काढू

Punjab Flood: पंजाबमधील पूर संकट; केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांनी आढावा घेतला

Crop Insurance : सांगलीत ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT