Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Monsoon Rain : मॉन्सूनच्या आगमनाला अवघे दोन दिवस झाले असताना जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : मॉन्सूनच्या आगमनाला अवघे दोन दिवस झाले असताना जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी शनिवारी (ता.८) दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता.७) रात्री देखील विजांच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरम्यान, जिल्ह्यात शनिवार येलो अलर्ट, रविवार ते मंगळवार (ता.९ ते ११) या काळात आँरेज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे.

जिल्ह्यात ६ जूनला मॉन्सून दाखल झाला. पहिल्या दिवशी सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्या. त्यानंतर शुक्रवार सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी ढगाळ वातावरण होते. सायकांळी पाच वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. हलक्या सरी काही भागात झाल्या.

मात्र रात्री साडेअकरा वाजल्यानंतर जिल्ह्यात विजांचा लखलखाट सुरू झाला. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दोन ते तीन तास पावसाची झोड सुरू होती. दरम्यान सकाळच्या सत्रात पावसाने उघडीप दिली होती. परंतु तीन वाजल्यानतंर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील कोरड्या पडलेल्या अनेक नद्या प्रवाहित होऊ लागले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत नद्या पूर्ण क्षमतेने वाहू लागण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने तर ९ ते ११ जून या कालावधीत आँरेज अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत सिंधुदुर्गात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असून प्रतिताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT