Nagpur News : करार पद्धतीने कुक्कुटपालन करताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, पशुखाद्याच्या बॅगवर घटकांची माहिती असावी, असे दोन शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या गेल्या दोन वर्षांतील लढ्याला यश मिळाले आहे.
राज्यात करारावर कुक्कुटपालन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र कुक्कुटपालक शेतकरी आणि संबंधित कंपनीमध्ये होणारा करार हा दोघांमध्येच अनेक ठिकाणी तोंडी पद्धतीने होतो. त्यामुळे अनेकदा फसवणुकीचेही प्रकार घडत होते. करारावरील कुक्कुटपालनाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने काही निकष निश्चित केले आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करारदार कंपनीकडून होत नव्हते.
त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत होता. त्या पार्श्वभूमीवर करारावरील कुक्कुटपालनात केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांची राज्य सरकारस्तरावर सक्तीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी कुक्कुट व्यवसायिकांची होती. पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे अध्यक्ष अनिल खामकर, शरद गोंडाबे, शुभम महाले यांनी पाठपुरावा केला. अखेरीस राज्य सरकारने करारावरील कुक्कुट पालनात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे, असा शासन आदेश काढला.
भारतीय मानक संस्थेच्या निकषानुसार पशुखाद्याच्या बॅगवर त्यातील घटक नमुद करावेत, असा नियम आहे. मात्र पशुखाद्य उत्पादक त्याकडे दुर्लक्ष करतात. आता उत्पादक संस्थेचे नाव, पत्ता, परवाना क्रमांक, उत्पादनाचा दिनांक व उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक, निव्वळ वजन, पशुखाद्यातील घटक नमूद करण्यास निर्देशित केले आहे.
काही घटकांत वाढ झाल्याचे सांगत कंपन्यांकडून पोल्ट्रीखाद्याचे दर वाढविले जातात. मात्र खाद्याच्या बॅगवर त्यातील घटकच नमूद नसल्याने दरात तेजी असलेला घटक किती प्रमाणात वापरला जातो, हे कळत नाही. यातूनच कंपन्या लूट करतात हे सिद्ध होते. त्यामुळे बॅगवर घटक असावे, अशी दोन वर्षांपासूनची मागणी होती. ती मान्य झाल्याने लढ्याला यश मिळाले.शरद गोडांबे, सदस्य, राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.