Fertilizer Bag : आता खतांच्या पोत्यांवर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र ; खत कंपन्यांना केंद्राचे आदेश

PM Modi Photo on Fertilizer Bag : केंद्र सरकाराने देशभरात सर्व प्रकारच्या रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापल्या जाण्याची माहिती समोर आली.
Fertilizer
FertilizerAgrowon

Kolhapur News : इथून पुढे खतांच्या पोत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र झळकणार आहे. याबाबतचे निर्देश खत कंपन्यांना सरकारने दिले आहेत. पंतप्रधान भारतीय जनूरवारक या खत अनुदान योजनेअंतर्गत ‘वन नेशन वन फर्टिलायझर’अंतर्गत ही कार्यवाही करण्यात येणार आहे.

Fertilizer
Urea Shortage : परभणी जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा

नवीन संभाव्य डिझाईन आणि लोगोची अधिसूचना खत कंपन्यांना देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या बॅग तातडीने तयार करून त्याची विक्री करण्यात यावी, असेही मंत्रालयाने खत कंपन्यांना सांगितले आहे. केंद्राद्वारे मंजूर केलेल्या डिझाइन व लोगोही संबंधित कंपन्यांना पाठवण्यात आले आहेत.

मोदी यांच्या छायाचित्राबरोबरच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा आणि पृथ्वी मातेला वाचवण्यासाठी संतुलित खतांचा वापर करावा, असे आवाहन करणारा मजकूरही वापरण्यात येणार आहे. पीएम प्रणाम या योजनेअंतर्गत हा मजकूर खतांच्या पोत्यावर वापरण्यात येणार आहे.

Fertilizer
Bogus Fertilizer : अनधिकृत खत कारखान्यातून 2 कोटींचा साठा जप्त

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पर्यायी खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आणि रासायनिक खतांच्या संतुलित वापरास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पीएम प्रणाम योजनेची कल्पना सप्टेंबर २०२२ मध्ये रब्बी मोहिमेसाठी झालेल्य कृषीवरील राष्ट्रीय परिषदेत मांडण्यात आली होती. नवीन योजना सुरू केल्याने रासायनिक खतांवरील अनुदानाचा बोजा कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

त्यामुळे शासनावरील अनुदानाचा बोजा कमी होईल आणि इतर खतांचा शेतीमध्ये वापर करून शेतीचा दर्जाही सुधारेल. यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होणार आणि लागवडीचा खर्च कमी होईल, असा केंद्राचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com