Gokul Milk Sangh : पूरग्रस्तांना 'गोकुळ'चा आधार, छावणीतील जनावरांसाठी १२ टन पशुखाद्य वाटप

Shirol Flood : शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्‍याच्‍या आवारात स्‍थलांतरित केली आहेत.
Gokul Milk Sangh
Gokul Milk Sanghagrowon
Published on
Updated on

Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) काल(ता.३१) शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर्सच्या छावणीला आठ टन पशुखाद्य देण्यात आले. तसेच, पार्वती सूतगिरणी मौजे तेरवाड येथील छावणीतील २०० जनावरांकरिता चार टन पशुखाद्य, असे एकूण १२ टन पशुखाद्य देण्यात आले.

यावेळी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालकांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने ‘गोकुळ’ने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

पूर क्षेत्रातील जनावरांसाठी गुरु‍दत्त शुगर्स, टाकळीवाडी (ता. शिरोळ) यांनी सामाजिक बांधिलकीतून राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड आदी गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्‍याच्‍या आवारात स्‍थलांतरित केली आहेत.

त्याकरिता ‘गोकुळ’कडून पशुखाद्य देण्यात आले. यावेळी अध्यक्ष डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ’ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. जनावरांना गुरुदत्त शुगर्स समूह तसेच पार्वती सूतगिरणीने दिलेला आधार मोलाचा आहे.’’

Gokul Milk Sangh
Gokul Milk Kolhapur : जनावरांवर होणार आयुर्वेदिक उपचार, ‘गोकुळ’चा हर्बल पशुपूरक प्रकल्प, काय आहे वैशिष्ट्य

यावेळी ज्येष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, संजय पाटील-यड्रावकर, बबन चौगले, बाळासाहेब पाटील व रमेश बुजुगडे, जवाहर पाटील, मानसिंग देशमुख, आर. व्ही. पाटील, अशोक पाटील, सुहास डोंगळे, विकास चौगले, दूध उत्पादक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com