Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Drought Conditions : शासन म्हणते दुष्काळ नव्हे, दुष्काळसदृश स्थिती

Current Drought Conditions : यंदा पाऊस कमी झाल्याने ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर १ हजार २१ महसूल मंडलांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली

Team Agrowon

Nagpur News : यंदा पाऊस कमी झाल्याने ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर १ हजार २१ महसूल मंडलांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली. यात नागपूर जिल्ह्यातील सिर्सी, मेंधला, सावनेर, पाटणसावंगी, देवलापार, खात, येनवा, मोहपा, केळवद, खापा, निमखेडा या ११ मंडलांचा समावेश आहे. दुष्काळऐवजी दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आल्याने येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नसून काही सवलतीच मिळणार आहेत.

यंदा पाऊस उशिराने दाखल झाला. त्यातही अनेक दिवस खंड राहिला. तर काही वेळा अतिवृष्टी झाली. याचा फटका पिकांना बसला. परिणामी, उत्पादन कमी झाले. सायोबीन तर जवळपास गेल्यात जमा आहे. तुरीचे उत्पादन घटणार आहे. कापसावरही परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येते.

कमी पाऊस पडल्याने शासनाने ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. दुष्काळी भागात शासनाकडून आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येते. राज्य शासनाने आर्थिक मर्यादेतही वाढ केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. राज्यातील १ हजार २१ महसूल मंडलांत पाऊस ७५० मिमीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे या मंडलांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली. पण यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणार नसून केवळ काही सवलतीच मिळतील.

.या मिळणार सवलती

जमीन महसुलात सूट

सहकारी कर्जाचे पुनर्गठन

शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट

शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी

‘रोहयो’तील कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर पुरवठा

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारला खरंच शेतकऱ्यांची चिंता असेल, तर दुष्काळ जाहीर करून आर्थिक मोबदला द्यावा.
- मनोहर कुंभारे, माजी उपाध्यक्ष, जि. प.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT