Drought Condition : मराठवाड्यात २७५ मंडले दुष्काळसदृश

Drought Crisis : आधी मराठवाड्यातील केवळ १४ तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने आता नव्याने काढलेल्या आदेशात मराठवाड्यातील ५४ तालुक्यातील २७५ मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आहे.
Drought Condition
Drought Conditionagrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : आधी मराठवाड्यातील केवळ १४ तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने आता नव्याने काढलेल्या आदेशात मराठवाड्यातील ५४ तालुक्यातील २७५ मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आहे.

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांत व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाले, अशा मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील अशा १०२१ महसुली मंडलांमध्ये १० नोव्हेंबरच्या शासन निर्णयाप्रमाणे दुष्काळसदृश परिस्थिती शासनाने घोषित केली आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ५४ तालुक्यांतील २७५ मंडलांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय पाहता हिंगोलीतील ५, लातूरमधील ९, बीडमधील ८, परभणीतील ९, नांदेडमधील ८, जालन्यातील ३, छत्रपती संभाजीनगरमधील ७ व धाराशिवमधील ५ तालुक्यांतील मंडलांचा दुष्काळ सदृश स्थितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Drought Condition
Drought Crisis : सातारा जिल्ह्यातील ७४ मंडलांत दुष्काळ जाहीर

यादीत चुका

शासन निर्णयसोबत जोडलेल्या जिल्हानिहाय सहभागी मंडळाच्या यादीत, तालुक्याच्या नावात धाराशिव जिल्ह्यामध्ये क्रमांक २२८ ते २३३ पर्यंत ‘गेवराई’ असे तालुक्याचे नाव दर्शविण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यापुढील मंडळ तुळजापूर तालुक्यातील दाखवण्यात आली आहेत. याशिवाय अजूनही शासनाच्याच निर्णयात धाराशिवऐवजी उस्मानाबाद व छत्रपती औरंगाबाद असे दिसत आहे.

Drought Condition
Drought Crisis : सोलापुरातील आणखी ६ मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश

या सवलती मिळणार...

 जमीन महसुलात सूट

 सहकारी कर्जाचे पुनर्गठण

 शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

 कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट

 शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

 रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

 आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टॅंकरचा वापर

 शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करण

प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय दुष्काळ सदृश मंडळ

हिंगोली

कळमनुरी

औंढा नागनाथ

वसमत

सेनगाव

धाराशिव जिल्हा

तुळजापूर

परांडा

भूम

कळंब

उमरगा

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

पैठण

फुलंब्री

वैजापूर

गंगापूर

खुलताबाद

सिल्लोड

कन्नड

जालना जिल्हा

जाफराबाद

घनसावंगी

परतूर

नांदेड जिल्हा

हादगाव

नांदेड

हिमायतनगर

नायगाव

कंधार

मुखेड

लोहा

परभणी जिल्हा

परभणी

पूर्णा

पालम

गंगाखेड

सोनपेठ

पाथरी

मानवत

सेलू

जिंतूर

बीड जिल्हा

बीड

पाटोदा

आष्टी

शिरूर कासार

गेवराई

माजलगाव

केज

परळी

लातूर जिल्हा

लातूर

औसा

निलंगा

शिरूर अनंतपाळ

उदगीर

जळकोट

देवणी

चाकूर

अहमदपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com