Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Bhakti Highway : भक्ती महामार्गासाठी हालचाली सुरूच

Highway Update : बुलडाणा जिल्ह्यातील प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव या ‘भक्ती’ महामार्गाला सर्वांचा विरोध असतानाही शासनाच्या वतीने भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना ग्रामपंचायतींच्या तसेच तलाठी कार्यालयांच्या फलकांवर लावण्यात येत आहे.

Team Agrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव या ‘भक्ती’ महामार्गाला सर्वांचा विरोध असतानाही शासनाच्या वतीने भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना ग्रामपंचायतींच्या तसेच तलाठी कार्यालयांच्या फलकांवर लावण्यात येत आहे. मध्यंतरी या महामार्गाचा विषय थंडावला होता. आता अधिसूचना फलकांवर लावल्या जात असल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.

मुंबई ते नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला तीर्थक्षेत्र शेगाव जोडण्यासाठी हा महामार्ग तयार केला जाणार असल्याचे सांगितले जाते. सुमारे १०९ किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून ४६ गावशिवारांतून महामार्ग प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते. यासाठी पहिल्या टप्प्प्यात सुमारे पाच हजार कोटींचे बजेट आहे.

यासाठी सुमारे दीड हजारांवर शेतकऱ्यांची चार हजार एकरांपेक्षा अधिक जमीन जाणार आहे. यामुळे अनेकजण भूमिहीन बनतील. शिवाय या महामार्गाची कोणीही मागणी केलेली नाही. सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी यासाठी विरोधी भूमिकेत आहेत. गावागावांत गेल्या काळात आंदोलनेही झाली. सिंदखेडराजा येथून समृद्धी महामार्गावरून शेगावला जाण्यासाठी सध्या चांगल्या दर्जाचे पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत.

देऊळगावराजा ते खामगाव मार्गालगत नवीन महामार्ग तयार होईल. जुन्या रस्त्याच्या ५० ते २०० मीटर अंतरावरून हा समांतर २० ते २५ पंचवीस किलोमीटर रस्ता जाणार असल्याचा दावा आंदोलक करीत आहेत. त्यामुळे हा महामार्ग नको, असा सार्वत्रिक सूर आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा गाजवणार असे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, तरीही या महामार्गाची प्रक्रिया पुढे नेली जात आहे. विशेष म्हणजे भक्ती महामार्ग रद्द करण्याबाबत शासनस्तरावरून कुठल्याही सूचना नसल्याने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

यापूर्वी चिखली तालुक्यात अधिसूचना झळकावण्यात आलेली आहे. त्यानंतर आता सिंदखेडराजा उपविभागात देऊळगावराजा तालुक्यात १० ते १२ गावांमध्ये अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर जमीन जाणार असल्याची माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT