Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Technology in Farming: शेतकऱ्यांचे माहितीविश्‍व बदलणार

AI for farming: शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये यापूर्वी न झालेला एक महत्त्वाचा बदल येणाऱ्या पिढीमध्ये होणार आहे. शेतकऱ्यांची माहिती प्रणाली पुढील काही वर्षांत तांत्रिक प्रगती, डेटा उपलब्धता आणि कनेक्टिव्हिटीमुळे बदलणार आहे.

शेखर गायकवाड

Indian Agriculture:

शेतकरी प्रामुख्याने बाजारभाव, हवामानाचा अंदाज आणि शेतीच्या सल्ल्यासाठी पारंपरिक पद्धतींवर अवलंबून असतात. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे शेतकरी रिअल-टाइम माहिती मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळतील.

अचूक शेती

मी इस्राईलमध्ये पाहिले की फळबागाचा मालक असलेला शेतकरी सकाळी सकाळी शेतात फेरफटका न मारता प्रथम छोट्या कंट्रोलरूममध्ये जातो. त्याला संगणकावर आज कोणत्या ओळीमधील किती नंबरच्या झाडाला पाणी द्यायचे हे संगणकावर दिसते. आठव्या रांगेतील ३१५ नंबरच्या ॲव्हेकॅडो फळाच्या झाडाला १० मिनिटे पाणी देऊन कंट्रोल रूम बंद करून तो निघून जातो. याला शास्त्रीय भाषेत ‘प्रिसीजन फार्मिंग’ म्हणजे अचूक शेती म्हणतात.

यातून शेतकऱ्यांच्या जीवनात सर्व क्षेत्रातच नेमकेपणा येईल. यापुढे शेतकरी IoT (Internet of Things) सेन्सर्स, ड्रोन आणि उपग्रह प्रतिमा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करून पीक आरोग्य, मातीची परिस्थिती आणि पाण्याच्या वापराचे निरीक्षण करता येईल. हा डेटा शेतकऱ्यांना पाणी, खते आणि कीटनाशक यांसारख्या निविष्ठांचा अनुकूल वापर करून उत्पादनात वाढ करायला व शेतीमधील खर्च कमी करण्यास मदत होईल.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान

ब्लॉकचेन तंत्रज्ञान व्यवहाराची पारदर्शक आणि सुरक्षित नोंदी तयार करण्यासाठी मदत करू शकेल, ज्यामुळे सोपी व पारदर्शक बाजारव्यवस्था व वेळेवर पैसे मिळण्याची सुविधा सुनिश्‍चित होईल. सोप्या झालेल्या करारपद्धतींमुळे स्वयंचलितपणे व्यवहार करता येईल. त्यामुळे कृषी पुरवठा साखळीतील विलंब आणि फसवणूक कमी होईल.

एआय अन् मशिन लर्निंग कीड व्यवस्थापन आणि पिकांच्या फेरबदलांसाठी शेतकरी प्रायोगिक पद्धतींवर अवलंबून असतात. एआय आणि मशिन लर्निंग अल्गोरिदमचा वापर कृषी डेटाचे विश्‍लेषण करण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे पिकांची निवड करणे सोपे होईल. या प्रणालीमुळे कीड-रोग नियंत्रण, आणि सिंचनावर मार्गदर्शन मिळेल.

डेटा-ड्रिव्हन निर्णय

अनेक शेतकरी अनुभवावर आणि मर्यादित माहितीच्या आधारे निर्णय घेतात. शेतकऱ्यांना सरकारी, खासगी क्षेत्र आणि समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे अधिक माहिती मिळेल, जेणेकरून त्यांना पीक कोणते लावायचे, कधी लावायचे आणि कधी कापायचे या बाबतीत अचूक निर्णय घेण्यास मदत होईल. शेतकऱ्याला योग्य निर्णय करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताही हवामानाचे नमुने, बाजाराची परिस्थिती आणि मातीच्या आरोग्याचे विश्‍लेषण करेल.

ई-कॉमर्सद्वारे थेट विक्री

शेतकरी प्रामुख्याने आपला माल विकण्यासाठी स्थानिक बाजारपेठेवर किंवा मध्यस्थांवर अवलंबून असतात. इंटरनेटचा वापर करून शेतकरी मध्यस्थांच्या मदतीविना थेट ग्राहकांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे त्यांची उत्पादने विकू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला नफा होऊन व्यापक बाजारपेठेत ते प्रवेश करू शकतात. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यासाठी व पाच ते १० मिनिटांत पैसे देणारे अनेक सॉफ्टवेअर तयार होतील.

स्मार्ट शेती उपकरणे

भारतात शेती यंत्रे अद्ययावत नाहीत किंवा अनेक लहान शेतकऱ्यांना ती परवडत नाहीत. काही काळानंतर, स्वयंचलित ट्रॅक्टर्स, हार्वेस्टर्स आणि सिंचन प्रणालीसारखी अत्याधुनिक उपकरणे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील.

हवामान-आधारित शेती

अनेक शेतकरी शाश्‍वत नसलेल्या पारंपरिक पद्धतीने शेती करतात. माहिती प्रणालीमुळे शेतकऱ्यांना हवामान बदल, मातीचे संरक्षण, जल व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेती पद्धतींच्या डेटाद्वारे टिकाऊ पद्धतींची शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल. उत्पादकता टिकवून पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या हवामान-स्मार्ट तंत्रांचा अवलंब कसा करावा याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होईल.

धोरणांचे एकत्रीकरण

डिजिटल एकत्रीकरणामुळे सरकारी योजना, अनुदाने आणि कृषी धोरणे यांचा वेळेवर लाभ मिळू शकेल. शेतकऱ्यांना त्यांच्या विशिष्ट गरजांच्या आधारे मार्गदर्शन मिळेल.

ग्रामीण इंटरनेट प्रवेश

५-जी आणि अन्य वायरलेस तंत्रज्ञानाच्या विस्तारित जाळ्यामुळे अगदी दुर्गम ग्रामीण भागांमध्येही इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारेल व त्यामुळे शेतकऱ्यांना रिअल-टाइम माहिती, ऑनलाइन बाजारात सहभाग आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल.

shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT