Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Rain : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Satara Monsoon : कोयना, कण्हेर, तारळी विसर्ग कायम ः प्रमुख धरणांत ७० टक्क्यांवर पाणीसाठा

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, अधूनमधून सूर्यदर्शन होत आहे. कोयनेसह सर्वच प्रमुख धरणांतील पाऊस कमी झाला असलातरी कोयना, कण्हेर, तारळी धरणांतून विसर्ग कायम आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यात २४ तासांत १९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, वाई या तालुक्यांत तुलनेत पाऊस जास्त असून अधूनमधून पावसाच्या दमदार सरी येत आहे. महाबळेश्वर, पाटण, सातारा या तीन तालुक्यांत ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दुष्काळी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. कोयनेसह सर्वच प्रमुख धरणांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयना धरणातील कोयना ७१, नवजा ६७ व महाबळेश्वर ९३ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात प्रतिसेकंद ३८,०१४ क्युसेक आवक होत आहे.

धरणाच्या सांडव्यातून ३०,००० व पायथा वीज गृहातून २१०० असा एकूण ३२,१०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. तसेच धोम-बलकवडी १४००, कण्हेर ४७६१, तारळी ५६६२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. प्रमुख धरणांत ७० टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा व कंसात टक्केवारी

कोयना – ८४.८६ (८०.६२), धोम – १०.८० (८०.००), धोम - बलकवडी – ३.४० (८३.३३), कण्हेर – ८.३८ (८२.९७), उरमोडी – ७.२२ (७२.४९), तारळी – ५.१० (८७.१८).मध्यम प्रकल्प - येरळवाडी – १.०० (८७.०४), नेर – ०.०७ (१६.८१), राणंद – ०.०३ (९.९६), आंधळी - ०.१२ (३५.३२), नागेवाडी- ०.०८ (३६.१६), मोरणा – १.४ (७५.१४), उत्तरमांड – ०.६२ (७०.५७), महू – ०.८९ (८१.२३), हातगेघर – ०.१३ (५०.०४), वांग (मराठवाडी) - २.१३ (७७.९१).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Market Committee Privatization: बाजार समित्या अदानी-अंबानींच्या घशात घालण्याचा डाव; नहाटा यांचा गंभीर आरोप

Sugarcane Crop Management: गारपीटग्रस्त स्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

Low Cost Feed Management: कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन

Quality Seeds Selection: वाण निवडीत दाखवा खरे शहाणपण

External Parasites Control: जनावरातील बाह्य परजीवींचे नियंत्रण

SCROLL FOR NEXT