Hapus Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : पहिल्या टप्प्यातील हापूस फेब्रुवारीअखेरीस बाजारात

राजेश कळंबटे

Ratnagiri News : कोकणात यंदा थंडी उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर काही भागात बहरल्याने हा आंबा फेब्रुवारीपर्यंत मिळू शकेल. मात्र, पाडव्यानंतरच हापूस बाजारपेठेत विक्रीला येईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शितलहरींचा प्रवाह अल्प प्रभावी ठरत असल्याने कोकणकिनारपट्टी भागात थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पहाटे काही प्रमाणात धुक्यासह आर्द्रतेत वाढ होऊन कमाल तापमान खाली येत आहे. तरी सकाळी आठनंतर तापमानात कमालीची वाढ होत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देशासह राज्यातील काही शहरांचा पारा घसरला असताना कोकणात मात्र उकाडा होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला. बागायतदारही अपेक्षित थंडीच्या चिंतेने ग्रासले आहेत. जानेवारीमध्ये अपेक्षित थंडी न पडल्यास आंबा मोहोरावरील फुटीचा वेग मंदावण्याची भीती आहे.

फुटीचा वेग मंदावल्यास त्याचा परिणाम फळधारणेवर आणि उत्पादनावरही होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत होते. सध्या पहाटेचा गारवा सोडल्यास दिवसभर तापमानात वाढ होत आहे. तर रात्रीही उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र पुढील आठवड्यात पारा आणखी खाली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील आठवड्यात थंडीचा जोर वाढणे अपेक्षित आहे. अन्यथा मोहोराच्या कालावधीत फुटवा फुटण्याचे वेग मंदावण्याची शक्यता आहे.

थंडी उशिराने पोहोचल्याने आंबा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मोहोर नव्याने येण्याची शक्यता आहे. सध्या आलेला मोहोर वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. मोहोर नव्याने आल्यास फळ येण्यासही उशीर होईल आणि उत्पन्न मिळणार नाही.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आंबा चांगला येईल. मात्र, बाजारात मोठी आवक वाढल्यास दर किती राहील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मागील आठवड्यात दापोली परिसरात काही महसुली मंडळात तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत राहीले आहे.

समुद्र किनारी भागात सध्या झाडांना पालवी फुटायला लागली आहे. दसऱ्यानंतर पाऊस पडल्यामुळे झाडाच्या बुध्यात पाणी मुरल्यामुळे ही पालवी येत आहे. या झाडांना तयार होणारा आंबा मे महिन्यात मिळेल. दसऱ्यानंतरचा मोहोर १० टक्के आहे. समुद्र किनाऱ्यापासून दूरवर असलेल्या बागांना चांगली फुट आली आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोरामधून फेब्रुवारी अखेरीस उत्पादन मिळेल. सध्या आंबा हंगामाला पोषक वातावरण आहे.
- उमेश रहाटे, आंबा बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT