Hapus Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Amba : रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना

Mango Season : रत्नागिरी जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी वाशी मार्केटला रवाना झाली.

Team Agrowon

Ratnagiri News : रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील बागायतदार रूपेश अनंत शितप यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी वाशी मार्केटला रवाना झाली. ऑक्टोबर महिन्यात प्रथमच हापूसची पेटी बाजारात पाठविण्यात आली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गतवर्षी आंबा हंगाम यथातथाच होता. यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. या कालावधीत उन्हाचा कडाका होताच. रूपेश शितप यांच्या रत्नागिरी शहराजवळील भाटये येथील आंबा बागेतील एका उंच हापूसच्या झाडाला जुलै महिन्यात मोहोर आल्याचे लक्षात आले. त्या झाडाला लवकर पालवी फुटली.

या झाडाला लवकर मोहोर येईल असे वाटत होते. यंदा पाऊस अनियमित राहिल्यामुळे ऊन पडण्याचा कालावधीत अधिक होता. त्यामुळे झाडाला ताण बसल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया यंदा लवकर सुरू झाली असे बागायतदार रूपेश यांनी सांगितले.

पावसाळ्यात मोहोर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर तो सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशक फवारणी केली. मोहोर आलेले ते झाड सुमारे ८० ते ९० फूट उंच असल्यामुळे मोहराच्या सुरक्षिततेसाठी कसरत करावी लागली. मोहरानंतर फळ तयार होईपर्यंत शितप यांनी काळजी घेतली.

सुदैवाने त्यांच्या मेहनतीला यशही आले. मोठ्या आकाराचे फळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी त्यांनी फळांची काढणी केली. चार डझनची पेटी म्हणजेच ४८ फळे शितप यांनी वाशी बाजारात विक्रीसाठी व्यापाऱ्याकडे पाठवली आहेत.

पावसात आलेल्या मोहराची योग्य काळजी घेतल्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात हापूसची चव चाखायला मिळणार आहे. यापूर्वी शितप यांच्या बागेतून दिवाळीच्या नंतर हापूसची पेटी पाठविण्यात आली होती; परंतु ऑक्टोबर महिन्यात प्रथमच हापूसची पेटी बाजारात विक्रीसाठी पाठवल्याचे रूपेश यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation: आंबा-काजू उत्पादकांच्या भरपाईवरून कृषिमंत्र्यांना घेरले

PACS Computerization: बारा हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण

Maharashtra Sowing Update: राज्यात केवळ तीन टक्के पेरण्या

Maharashtra Rain Forecast: राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT