Mango Farming : किनारपट्टी भागात आंब्यांना लागला मोहोर आणि फळे

Mango Blooming : किनारपट्टी भागात दरवर्षी जून-जुलैमध्ये काही झाडांना मोहोर येतो. परंतु या वर्षी मोहोर येण्याचे प्रमाण वाढले आहे.
Mango
Mango Agrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील हापूसच्या झाडांना ऐन पावसाळ्यात मोहोर आणि फळधारणा झाली आहे. क्षारयुक्त वारे आणि या वर्षी झाडांना बसलेला अतिरिक्त ताण यामुळे झाडांना मोहोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे हा मोहोर टिकविणे आंबा बागायतदारांसमोर आव्हान ठरणारे आहे.

Mango
Kesar Mango Cultivation : सघन पद्धतीने केसर आंबा लागवडीचे तंत्र कसे आहे?

किनारपट्टी भागात दरवर्षी जून-जुलैमध्ये काही झाडांना मोहोर येतो. परंतु या वर्षी मोहोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेला. विशेषतः किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पंधरा ते सतरा दिवस अजिबात पाऊस झाला नव्हता.

Mango
Organic Mango Satara Farmer : साताऱ्यातील दुष्काळी भागात पिकवला सेंद्रिय केशर आंबा, परेदशात निर्यात, लाखोंची कमाई

एकीकडे पाऊस नव्हता तर दुसरीकडे कडक ऊन त्यामुळे झाडांच्या मुळातील ओलावा कमी झाला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळच्या वेळेत हलक्या सरी बरसत होत्या.

त्यामुळे रात्रीच्या वेळी गारवा निर्माण झाला होता. त्याचा परिणाम या भागातील हापूस आंब्याची अनेक झाडे ऐन पावसाळ्यात मोहोरली असून, काही झाडांना फळधारणा देखील झालेली दिसून येत आहे.

कोकणात मे महिन्यात पाऊस लांबणीवर गेला आणि उष्णतेचे प्रमाण वाढले. क्षारयुक्त वारे आल्यामुळे आंबा निर्माण होण्यासाठी पालवी आणि मोहोर याला पोषक वातावरण झाले आणि झाडाला मोठ्या प्रमाणावर मोहोर आला. त्यातून जो मोहोर टिकला त्यातून ही फळधारणा झाली. यामागे कोणतेही मोठे संशोधन नसून निसर्गाच्या बदलाचा परिणाम आहे.
- महेश सामंत, ज्येष्ठ आंबा बागायतदार, वेगुर्ले
क्षारयुक्त वाऱ्यांमुळे दरवर्षी किनारपट्टीच्या झाडांना मोहोर येतो. या वर्षी काहीसा अतिरिक्त ताण बसल्यामुळे प्रमाण अधिक आहे. ज्या शेतकऱ्यांची लहान झाडे आहेत त्यांनी आच्छादन करून उत्पादन घेण्यास हरकत नाही.
- डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ, रामेश्‍वर फळसंशोधन उपक्रेंद्र, देवगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com