Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : नांदेडला खरिपाची अंतिम पैसेवारी ४७.८७ पैसे जाहीर

Kharif Season : खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी शुक्रवारी (ता. १५) जाहीर केली. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ४७.८७ पैसे जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी शुक्रवारी (ता. १५) जाहीर केली. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ४७.८७ पैसे जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यानंतर पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जाहीर होणाऱ्‍या खरीप पिकांच्या उत्पादकतेची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५६२ गावांत आठ लाख ७१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यांपैकी यंदा सात लाख ९८ हजार ५६८ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे.

या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा अंदाज ता. ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या हंगामी नजरी पैसेवारीवरून व्यक्त करण्यात आला होता. यात आठ तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा अधिक, तर उर्वरित आठ तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाली होता. यानंतर सुधारित अंदाज ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला.

यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. यानंतर शुक्रवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यातही सर्वच तालुक्यांची पैसेवारी ४७.८७ पैसे जाहीर केली आहे.

खरिपातील अंतिम पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे नुकसानग्रस्तांसाठी सोयीसुविधा लागू होणार आहेत.

तालुकानिहाय जाहीर झालेली अंतिम

पैसेवारी (टक्क्यांमध्ये) (कंसात गावांची संख्या)

नांदेड ४७ (८८), अर्धापूर ४८.३३ (६४), कंधार ४८(१२६), लोहा ४६ (१२७), भोकर ४८ (७७), मुदखेड ४८ (५५), हदगाव ४९ (१३७), हिमायतनगर ४८ (६४), किनवट ४७.६० (१९१), माहूर ४८ (९२), देगलूर ४९ (१०८), मुखेड ४६ (१३५), बिलोली ४७ (९१),नायगाव ४८ (८९), धर्माबाद ४९ (५६), उमरी ४९ (६२). (नांदेड तालुक्यातील १३ गावांचे नागरीकीकरण झाले आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT