Desi Cow
Desi Cow Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Cow Breed : गो-कृपा अमृतमुळे शेतीची सुपीकता वाढ शक्य

Team Agrowon

Washim News : गो-कृपा अमृत हे शेतीची सुपीकता वाढविण्यासोबतच रोग व किडींच्या नियंत्रणासाठी फायदेशीर आहे, असे मत अहमदाबाद येथील बन्सी गीर गोशाळेचे गोपालभाई सुतारिया यांनी केले.

कृषी विभाग (Agriculture Departnebt), आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने येथे सोमवारी (ता.१७) ‘गो-कृपा अमृत शेतीतील एक पारंपरिक पद्धती’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे होते.

या वेळी मुख्य मार्गदर्शक श्री. सुतारिया बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व प्रगतिशील शेतकरी पवन मिश्रा उपस्थित होते.

श्री. सुतारिया यांनी मार्गदर्शनात ‘गो-कृपा अमृत शेतीतील एक पारंपरिक पद्धती’विषयी माहिती दिली. त्यांनी गाईचे शेतीतील महत्त्व तसेच मानवी आरोग्याकरिता गायीच्या दुधाचे, दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र व शेण यांचा उपयोग सांगून मानवी आरोग्य व शेतीची सांगड घालत असताना गो-आधारित शेती म्हणजेच गाईच्या गोमूत्र व शेणापासून फायदेशीर जिवाणू घेऊन तयार केलेले गो-कृपा अमृत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

वाशीम जिल्ह्याची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल आणि शेतकऱ्यांच्या सहभागाविषयी श्री. हिंगे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी केव्हीकेचे शास्त्रज्ञ निवृत्ती पाटील तसेच विविध शेतकऱ्यांनी गोकृपा अमृतविषयी अनुभव कथन केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी केले. आपत्ती व्यवस्थापनाबाबत मानसेवा सामाजिक आपती व्यवस्थापन व संत गाडगेबाबा आपत्ती शोध व बचाव पथकाचे जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी उष्माघात, आपत्ती व्यवस्थापन, पूर, वीज व आग याविषयी माहिती दिली.

या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक तसेच पाणी फाउंडेशनच्या गटातील शेतकरी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनमधील गटातील शेतकरी, ‘आत्मा’अंतर्गत सेंद्रिय शेती गटातील शेतकरी व वंदे गोमातरम गटाचे गोपालक शेतकरी उपस्थित होते.

कार्यशाळेसाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रवी अंभोरे, विनोद मारवाडी, नागोराव खोंड, सागर बदामकार, गजानन दंडे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT