River Sludge Agrowon
ॲग्रो विशेष

River Sludge : शेतकऱ्यांने स्वखर्चाने काढला नदीपात्रातील गाळ

Bori River Update : बोरी धरणाच्या सांडव्याकडून पूर्वेला वाहणाऱ्या नळदुर्ग शेजारील बोरी नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांने स्वखर्चाने काढला.

Team Agrowon

Dharashiv News : बोरी धरणाच्या सांडव्याकडून पूर्वेला वाहणाऱ्या नळदुर्ग शेजारील बोरी नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांने स्वखर्चाने काढला. यामुळे बोरी नदीपात्राचे खोलीकरण झाले आहे तर गाळ काढणारे शेतकरी शशिकांत कुलकर्णी यांची एक हेक्टर जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे.

मागील महिनाभरात शशिकांत कुलकर्णी यांनी सुमारे २ लाख ८० हजार रुपये खर्च करून १ हेक्टर क्षेत्रात बोरी नदीतील सुमारे एक हजार ट्रॕक्टर गाळ काढून टाकला. यामुळे जमीनीची सुपीकता वाढणार आहे.

तसेच बोरी नदीचे पाचशे फूट लांब, पंधरा फूट रूंद व दहा फूट खोल एवढे खोलीकरण झाले आहे. यामुळे स्वतः कुलकर्णी यांना व परीसरातील असंख्य शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

यापूर्वी २०१५ मध्ये नाम फाउंडेशन व नळदुर्ग किल्ल्याचे जतन ,संवर्धन करणाऱ्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने बोरी नदीचे खोलीकरण केले होते त्यावेळी दोनशे पन्नास हायवा भरून गाळ श्री. कुलकर्णी यांनी शेतात टाकला होता.

यापासून प्रेरणा घेत कुलकर्णी यांनी मागील महिन्यात स्वखर्चाने बोरी नदीतील गाळ काढला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT