Sludge Excavation : साखरा धरणातून अवैध गाळउपसा

Sakhara Dam : साखरा ग्रामपंचायतीने गाळ काढण्यासाठी दिलेली परवानगी मागे घेतली आहे. याबाबतचे पत्र संबंधित विभागाला मागील महिन्यात देण्यात आले होते; मात्र तरीही कंपनीने धरणात उत्खननाचे काम सुरू ठेवले आहे.
Sludge Exavation
Sludge ExavationAgrowon
Published on
Updated on

Latest Agriculture News : डहाणू तालुक्यात वाणगावजवळ साखरा धरण आहे. धरणाची खोली वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीने धरणातील माती, मुरूम व गाळ काढण्याचा ना हरकत दाखला माँटो कार्लो कंपनीला दिला होता.

मात्र माँटो कार्लो कंपनीने ना हरकत दाखल्यात नमूद केलेल्या अटी-शर्तीचे पालन केलेले नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला होता.

तसेच साखरा ग्रामपंचायतीने माँटो कार्लो कंपनीला गाळ काढण्यासाठी ना हरकत दाखला मागे घेतला आहे. त्यामुळे कंपनीने काम बंद करायला हवे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच काम बंद न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sludge Exavation
Galmukt Dharan Scheme : ‘गाळमुक्त धरण’ योजनेअंतर्गत २.९५ लाख घनमीटर गाळ उपसा

साखरा ग्रामपंचायतीने गाळ काढण्यासाठी दिलेली परवानगी मागे घेतली आहे. याबाबतचे पत्र संबंधित विभागाला मागील महिन्यात देण्यात आले होते; मात्र तरीही कंपनीने धरणात उत्खननाचे काम सुरू ठेवले आहे.

Sludge Exavation
Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात पहिला

त्यामुळे साखर ग्रामस्थांनी एकत्र जमत काम रोखले. तसेच कंपनीने अटी-शर्तीनुसार काम केले नसल्याचे म्हटले. कंपनीने ठरलेल्या क्षेत्रातून गाळ न काढता इतर क्षेत्रातून मुरूम व माती काढली. त्यामुळे अनेक भागात मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी झाडांच्या जवळील माती काढली जात आहे. यामुळे धरणाचे सौंदर्य सुद्धा बिघडत आहे.

साखरा ग्रामपंचायतीने घरणातील गाळ काढण्यासाठी दिलेला ना हरकत दाखला मागे घेतला आहे; मात्र तरीही कंपनीने अटी-शर्तीचे पालन केले नाही. कंपनीने तत्काळ धरणातील उत्खननाचे काम थांबवावे.
- रेखा कवट्या, सरपंच, साखरा ग्रामपंचायत.
साखरा ग्रामपंचायतीने कंपनीला अनेक अटी-शर्तीवर गाळ काढण्याची परवानगी दिली होती; मात्र कंपनीने मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले आहेत. तसेच माती व मुरूम वाहतूक करताना गावातील रस्ते सुद्धा खराब झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने दिलेली परवानगी मागे घेतली. मात्र तरीही कंपनीकडून उत्खनन सुरूच आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर आम्ही मोर्चा काढणार आहोत.
- रघुनाथ सुतार, ग्रामस्थ
साखरा ग्रामपंचायतीने पूर्वी माती, मुरूम काढण्यासाठी ना हरकत दाखला दिला होता. आता पुन्हा त्यांनी ना हरकत दाखला मागे घेतला आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी डहाणू तहसीलदारांना पाठवण्यात येणार आहे. चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल.
- सुभाष भागडे, निवासी उपजिल्हाधिकारी पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com