Vaishnavi Balasaheb Bhor Agrowon
ॲग्रो विशेष

Exam Success Story : शेतकऱ्याची मुलगी झाली तंत्र अधिकारी

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील सर्वसामान्य शेतकऱ्याची कन्या वैष्णवी बाळासाहेब भोर हिची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (जालना) या ठिकाणी तंत्र अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याने तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

येथील वरचा हिंगेमळा येथे राहणारे बाळासाहेब भोर यांची कन्या वैष्णवी बाळासाहेब भोर हिचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. येथीलच विद्या विकास मंदिर विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले.

त्यानंतर नारायणगाव येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय (कोल्हापूर) येथून कृषी शाखेची पदवी संपादन केली. सध्या ती पुणे येथील कृषी महाविद्यालयात कृषी वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

वैष्णवी बाळासाहेब भोर हिने २०२२ मध्ये महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दिली. त्यामधून पहिल्याच प्रयत्नात जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात तंत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांच्या हस्ते वैष्णवी बाळासाहेब भोर हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी तिचे वडील बाळासाहेब भोर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Punjab CM Bhagwant Mann : युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या पीएम मोदींना येथील धूर थांबणे का शक्य नाही? प्रदुषणाच्या मुद्द्यावर मोदींना मुख्यमंत्री भगवंत मान यांचा टोला

Amla Processing : आवळ्यापासून जॅम, गर, सरबत

E NAM Bajar Scheme : ‘ई-नाम बाजार’ योजनेचा उठला बाजार, समित्यांसह शेतकऱ्यांनाही लाभ नाही

Ragi Crop : पावसाने नाचणीला पिकास फटका; उत्पादनावर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भिती

Kolhapur Rain Forecast : कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस; ५ ठिकाणी विज कोसळली, दोन दिवस येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT