Nanded Agriculture Department : नांदेड जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने विभागाला संजीवनी

Agriculture Department : नांदेड जिल्ह्यात चार तालुका कृषी अधिकारी अधिकारी रुजू
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा कारभार असलेल्या कृषी विभागातील रिक्त पदांवर राज्य शासनाने सरळसेवा भरतीने तसेच पदोन्नतीने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात रिक्त असलेल्या चार तालुक्यांना तालुका कृषी अधिकारी मिळाले आहेत. तर देगलूर उपविभागीय कृषी अधिकारी पद पदोन्नतीने भरले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कृषी विभागाला अधिकारी मिळाल्याने कामाला गती येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात आठ लाख ८८ हजार ८०७ खातेदार शेतकरी आहेत. तर आठ लाख ५० हजार २९० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. अशाप्रकारे मोठा कारभार असलेल्या कृषी विभागात मागील अनेक दिवसांपासून रिक्त पदांमुळे कामांचा खोळंबा होत होता. सोळापैकी तब्बल आठ तालुका कृषी अधिकारी पद, देगलूर उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेतील दोन जिल्हा कृषी अधिकारी पदे रिक्त होती. पद रिक्त झालेल्या ठिकाणी कनिष्ठ अधिकाऱ्यांना पदभार देण्यात येत असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांचे काम करून पदभार सांभाळावा लागत होता. दरम्यान राज्य शासनाने विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच पदोन्नत्या केल्या आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : २१४ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडवल्या

यात काही ठिकाणी नव्याने अधिकारी रुजू झाले आहेत. काही ठिकाणी पदोन्नतीने रिक्तपदी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी पदोन्नती झाली आहे. तर कंधार तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गिते यांची देगलूर उपविभागीय कृषी अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. नांदेड तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्‍वर मोकळे यांची सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कृषी उपसंचालक म्हणून पदोन्नती झाली आहे. नांदेड तालुका कृषी अधिकारी म्हणून संजय चातरमल रुजू झाले आहेत. नांदेड टीएओमधील मंडळ कृषी अधिकारी सतीश सावंत यांची छत्रपती संभाजीनगर एसएओमध्ये तंत्र अधिकारी, तर पालमचे मंडळ कृषी अधिकारी माधव चामे यांची नांदेड एसएओ कार्यालयात कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

सरळसेवा भरतीने अधिकारी नियुक्त

मागील अनेक दिवसांपासून हिमायतनगर, नायगाव, बिलोली व धर्माबाद या ठिकाणची तालुका कृषी अधिकारी पदे रिक्त होती. यात रिक्त असलेल्या हिमायतनगर तालुका कृषी अधिकारीपदी जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी बालाप्रसाद बंदेल यांची नियुक्ती झाली आहे. तर सरळ सेवा भरतीने नायगाव तालुका कृषी अधिकारीपदी दिवेश देवरे, बिलोली तालुका कृषी अधिकारीपदी बळिराम सातपुते, धर्माबाद तालुका कृषी अधिकारीपदी पुष्पराज खोत यांची नियुक्ती झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com