Pune News : राज्यातील १९ कृषी उपसंचालकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) पदावर बढती देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ मधील (कृषी उपसंचालक) संवर्गातील १९ अधिकाऱ्यांना एसएओ पदावर तात्पुरत्या पदोन्नतीस सामान्य प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वीच मान्यता दिली. तसा शासन निर्णय कृषी उपसचिव प्रतिभा पाटील यांनी या जारी केला आहे. बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांना ३० दिवसांच्या आत नव्या पदांवर रुजू होण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.
बढती देताना संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू नाही अथवा तशी शिफारस करण्यात आली नसल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. दरम्यान, कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की बढत्या देताना काही अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शासन केवळ विभागीय चौकशीचा मुद्दा तपासते. इतर चौकशा सुरू असल्यास बढतीचा मार्ग मोकळा केला जातो. यामुळे कृषी खात्यात सध्या काहीही घोटाळा करा; फक्त विभागीय चौकशी होणार नाही याची काळजी घ्या, असा चुकीचा संदेश मंत्रालयातून दिला जात आहे.
बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे व कंसात नियुक्तीचे पद व ठिकाण असे : दत्तकुमार कळसाईत (एसएओ, नांदेड), प्रदीप लाटे (प्रकल्प संचालक, आत्मा, अहिल्यानगर), प्रफुल्ल बनसोडे (अधीक्षक कृषी अधिकारी, मग्रारोहयो, ठाणे), धनश्री जाधव (प्रकल्प संचालक, आत्मा, छत्रपती संभाजीनगर), वैभव शिंदे (प्रकल्प व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ, पुणे),
सुरज जगताप (एसएओ, धुळे), अजय शेंडे (प्रकल्प संचालक, आत्मा, सातारा), दत्तात्रय काळभोर (प्रकल्प व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ, पुणे), रामेश्वर पाचे (एसएओ, ठाणे), प्रणाली चव्हाण (समन्वयक अधिकारी, विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, कोल्हापूर), अभयकुमार चव्हाण (प्रकल्प संचालक, आत्मा, सांगली), नीलेश कानवडे (एसएओ, गोंदिया),
अभिमन्यू काशीद (प्रकल्प संचालक, आत्मा, नाशिक), अरविंद उपरीकर (अधीक्षक कृषी अधिकारी, मग्रारोहयो, नागपूर), नीलेश ठोंबरे (अधीक्षक कृषी अधिकारी, मग्रारोहयो, अमरावती), सूरज मडके (प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे), विजय बेतीवार (प्रकल्प संचालक, आत्मा, रत्नागिरी), शिवकुमार सदाफुले (एसएओ, रत्नागिरी), शुक्राचार्य भोसले (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.