Crop Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Harvesting : शेतकऱ्याला काढणीच्यावेळी पावसाचा धसका

Mung Harvesting : जळकोट तालुक्यातील चित्र : मुगासह उडदाचे अत्यल्प उत्पन्न, खर्चही वसूल होईना

Team Agrowon

Jalkot news : जळकोट : तालुक्यात खरिपातील मुगानंतर आता उडदाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. मात्र ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणारा पाऊस, मजुरीचा वाढता खर्च आणि उत्पन्नात येत असलेली घट अशा कचाट्यात शेतकरी सापडलेला आहे. कापणी करताना कधी मुसळधार पाऊस येईल याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. मुगानंतर उडदाच्या काढणीस सुरवात झाली. मात्र खरीप हंगामात सततच्या पावसाने विविध पिकांच्या उत्पन्नात कमालीची घट येत आहे. पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च काढल्यास हाती काहीच उरत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यात सुरवातीला पेरलेल्या खरिपातील उडदाच्या राशी हार्वेस्टरने केल्या जात आहेत. परंतु पावसामुळे व वावरातील चिखलामुळे उडीद कसा काढायचा हा प्रश्न आहे. मुगानंतर उडदाच्या काढणीस अनेक

ठिकाणी सुरवात झाली आहे. उडदाच्या काढणीत ढगाळ वातावरण, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, त्यात मजूर टंचाई आणि वाढलेली मजुरी अशा तिहेरी चक्रात शेतकरी सापडला आहे. फायदा-तोटा न पाहता उडदाची काढणी शेतकरी करीत आहेत.एका बॅगेला चार ते पाच हजार रुपये कापणीसाठी मागितले जात आहेत. दोनशे ते तीनशे रुपये प्रतिकट्टा (पन्नास किलो) हार्वेस्टर घेत असल्याने खर्चजास्त होत आहे. पेरणी, कोळपणी, आंतरमशागत, फवारणी, खुरपणीपासून राशीपर्यंत खर्च काढल्यास हाती भोपळा उरत आहे. सद्यःस्थितीत राशी करणे सुरू असून उतारा कमी येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मी एक एकरामध्ये उडदाचे पीक घेतले. पेरणीला खत घालून दोन कोळपणी केली, फवारणी केली. हरणासह वन्यप्राण्यांपासून पिकाची राखण केली. मात्र अतिपावसामुळे उडदाच्या पिकाचे नुकसान झाले. एकीकडे ढगाळ वातावरण व पाऊस कधी येईल सांगता येत नाही, त्यामुळे काढणी कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मजुरीही वाढली असून आणखी पाऊस जास्त आला तर हातचे पीक जाणार आहे. लागवड व काढणी खर्चाची गोळाबेरीज करता हाती भोपळाच उरत आहे.

- मधुकर डोणगावे, शेतकरी, जळकोट.

सध्या बाजारात मुगासह उडदाची काही प्रमाणात आवक सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मालाची प्रतवारी खालावलेली येत आहे.त्यामुळे उडदाचा बाजारात भाव चार हजार, पाच हजार ते साडेसात हजार प्रतिक्विटंल मिळत आहे.

- संजय मिसाळे, डत व्यापारी, जळकोट.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT