
शिरपूर, जि. धुळे : Karjmafi News : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेपासून (Mahatma Jotirao Phule Debt Relief Scheme) शेतकऱ्याला वंचित ठेवल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विखरण (ता. शिरपूर) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आठ हजार रुपये नुकसान भरपाई (Compensation for damage) देण्यासह कर्जमाफीचा लाभ देण्याचा आदेश दिला.
बँकांच्या कारभारामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय मानला जात असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
विखरण येथील शेतकरी गुलाब तुकाराम पाटील व त्यांची पत्नी संगीता पाटील यांनी २०१६ मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विखरण शाखेकडून अनुक्रमे एक लाख ५० हजार व ७० हजार रुपये असे पीककर्ज घेतले होते.
शेतीमालाला भाव नसल्यामुळे व नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानामुळे पाटील दांपत्य वेळेत कर्जाची परतफेड करू शकले नाही.
दरम्यान, कर्जबाजारीपणामुळे वाढलेल्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेऊन शासनाने एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना जाहीर केली.
कर्जमाफीच्या निकषांत पात्र असतानाही पाटील दांपत्याचे नाव कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत नव्हते. त्यामुळे ते लाभापासून वंचित राहिले.
पाटील यांनी बँकेचे शाखाधिकारी, सहाय्यक निबंधक, तक्रार निवारण अधिकारी, तहसीलदार यांच्याकडेच वेळोवेळी तक्रारी अर्ज दिले, मात्र कर्जमाफी यादी दर्शवणाऱ्या पोर्टलकडे शाखाधिकाऱ्यांनी त्यांचे नाव वर्ग केले नाही. त्यांचे आधार प्रमाणीकरणही केले नाही.
त्यामुळे गुलाब पाटील यांनी बँकेचे शाखाधिकारी, नाशिक विभागीय व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक व जिल्हाधिकाऱ्यांना नोटिसा पाठविल्या. मात्र तक्रारदाराच्या अर्जाची दखल न घेता उलटपक्षी त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावण्यात आला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.