MLA Ashok Chavan Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : साखरे सोबत इतर उत्पादने घेतली तरच कारखानदारी परवडेल

साखर कारखानदारीची आगामी काळाची वाटचाल कशी असली पाहिजे याचे नियोजन जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले आहे.

Team Agrowon

hingoli News : कारखानदारांना साखर उत्पादनातून नफा मिळू शकेल अशी परिस्थिती आता राहिली नाही. केवळ साखर उत्पादन (Sugar Production) करणारे कारखान्याचे आर्थिकदृष्ट्या डबघाईस येऊ लागले आहेत.

इथेनॉल, वीज निर्मिती, सीबीजी (काँम्प्रेसड बायो गॅस), हायड्रोजन आदी उपपदार्थाचे उत्पादन केले तरच आगामी काळात साखर कारखानदारी परवडू शकेल. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देता येईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (MLA Ashok Chavan) यांनी केले.

वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखानाच्या येथे नविन इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन आणि नवीन सीबीजी प्रकल्पाचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (ता. १८) करण्यात आले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी परभणीचे खासदार संजय जाधव होते. माजीमंत्री कमलकिशोर कदम, पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू उर्फ चंद्रकांत नवघरे, माजी आमदार अॅड. मुंजाजीराव जाधव, पंडितराव देशमुख, बाजार समितीचे सभापती तान्हाजी बेंडे, उपसभापती सचिन भोसले, उपाध्यक्ष प्रल्हाद काळे, कार्यकारी संचालक अमोल पाटील आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, की साखर कारखानदारीची आगामी काळाची वाटचाल कशी असली पाहिजे याचे नियोजन जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले आहे. उद्धव ठाकरे नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकारने भरपूर विकास कामे केली.

शिंदे-फडणवीस सरकारने निवडणुकीत फायदा होईल या उद्देशाने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा या बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात ठरतील. प्रास्ताविक दांडेगावकर यांनी केले. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT