Sangli News : जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांनी (Sugar factory) आजअखेर ७३ लाख २६ हजार ६० टन उसाचे गाळप केले आहे. तर ८६ लाख १४ हजार ३५८ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.५३ टक्के आहे. येत्या आठवड्यात साखर कारखान्यांची धुराडी थंडावतील असे चित्र आहे.
जिल्ह्यातील गाळप हंगाम (Sugar Crushing Season) आता जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. चालू हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख २४ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र होते.
यंदा खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांसह कर्नाटकातील साखर कारखान्यांचे कडवे आव्हान राहिले असल्याचे चित्र पहायला मिळाले.
हंगामाच्या तोंडावरच मुसळधार पाऊस आणि नंतर परतीचा पाऊस यामुळे यंदा गाळप हंगाम उशिरा सुरू झाला. यामुळे साखर कारखान्यांना वेळेत गाळप करण्यासाठी आव्हान होते.
त्यातूनही साखर कारखान्यांनी गाळपाचे काटेकोर नियोजन केले. त्यामुळे ऊस तोडणी वेळेत करण्यासाठी साखर कारखान्यांना काही प्रमाणात यश आले असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात या हंगामात सांगलीतील दत्त इंडिया साखर कारखान्याने ९ लाख ९२ हजार १८६ टन उसाचे गाळप केले असून ११ लाख २४ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव युनिटने १२.७४ टक्के साखर उतारा आहे.
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील उसाची तोड संपवली आहे. येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील कारखान्यांची धुराडी बंद होतील, अशी शक्यता साखर कारखानदारांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेल गाळप
कारखाना - गाळप (टन)- साखर (क्विंटल) - साखर उतारा
क्रांती - ८५४३०० - ८७६४४० - १०.३४
हुतात्मा - ४६९३३०- ५१६६००- ११.६४
सोनहिरा- ८०९२८०- ९४९९६०- ११.५२
उदगिरी - ५४१३८०- ६१४२३० - ११.४०
साखराळे- ८३२६५५- ९३४००० - १२.२३
वाटेगाव - ४७३५३०- ५५९५००- १२.७४
कारंदवाडी- ३६३८७५- ४६५५००- १२.४४
जत - २७९२३५ - ३०३५३०- १०.८७
विश्वास- ५६४६०० - ६९७४२०- १२.५८
मोहनराव - ३६७६४०- ४०९७५०- ११.२३
दत्त इंडिया- ९९२१८६ - ११२४८५०- ११.४५
श्री. श्री. राजेवाडी- ६७९९६८- ६०३८७८- ०८.८२
निनाईदेवी- ४६२०४५- ५५८७००- १२.२४
एकूण - ७३२६०६०- ८६१४३५८- ११.५३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.