Pesticide Export Agrowon
ॲग्रो विशेष

Pesticide Export : देशातील कीडनाशकांची निर्यात ४५ हजार कोटींवर

Pesticide Production : देशातील कीडनाशके निर्मिती उद्योगाकडून तयार केल्या जात असलेल्या कीडनाशकांना जगभर मागणी वाढते आहे.

मनोज कापडे

Pune News : देशातील कीडनाशके निर्मिती उद्योगाकडून तयार केल्या जात असलेल्या कीडनाशकांना जगभर मागणी वाढते आहे. त्यामुळेच अवघ्या २७ वर्षांत कीडनाशके विक्रीची बाजारपेठ ४५ हजार कोटींच्या पुढे गेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय कीडनाशके उत्पादक व घटक मिश्रण उत्पादने संघटनेच्या (पीएमएफएआय) सूत्रांनी सांगितले, की देशाचा कीडनाशके उद्योगाची निर्यात १९९७ मध्ये केवळ २७० कोटींची होती.

आता हा उद्योग उड्डाणावस्थेत आलेला असून, निर्यात ५० हजार कोटींच्या दिशेने वाटचाल करते आहे. गुणवत्ता, चांगली सेवा, उत्पादनातील वैविध्यता यामुळे निर्यात वाढते आहे. त्यामुळेच संघटनेने दुबईत नुकत्याच घेतलेल्या आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण परिषद व प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

भारतीय कीडनाशके उद्योगाने दुबईत आयोजित केलेल्या या दोनदिवसीय परिषदेत जगभरातील १२०० प्रतिनिधींनी भाग घेतला. तसेच अडीच हजार व्यक्तींनी प्रदर्शनाला भेट दिली. विशेष म्हणजे जगाच्या पीक संरक्षण क्षेत्रातील ९१ नामवंत कंपन्यांनी या परिषदेत सहभाग घेतला. पीक संरक्षण क्षेत्रातील शास्त्रज्ञ, संशोधक, जैव उत्पादक निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचा व प्रतिनिधींचा यात समावेश होता.

कृषी रसायन एक्स्पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक अतुल चुरीवाल यांनी जगाला उत्तम निविष्ठा पुरवण्यात आता चीनच्या तुलनेत भारत सरस ठरत असल्याचे ठासून सांगितले. मात्र जागतिक तापमान वाढीचे परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर होत असून, भविष्यात ती सर्वांसाठी चिंतेची बाब राहील, असे त्यांनी या परिषदेत नमूद केले. भारतीय सूक्ष्म अन्नद्रव्ये उत्पादक संघटनेचे (आयएमएमए) अध्यक्ष राहुल मिरचंदानी यांनी चिलेशन तंत्रज्ञानाच्या आधारे आता समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विस्तार होत असल्याचे स्पष्ट केले.

जगातील आहार संस्कृतीमधील बदल व त्याचे निविष्ठा मागणीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा या परिषदेत घेण्यात आला. तसेच भारतीय कृषी रसायने क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल या परिषदेत गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष नादिर गोदरेज यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड देण्यात आला.

‘जैविक खतांचा वापर महत्त्वाचा राहणार’

संगणकीय तंत्र आधारित विविध प्रणाली (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) यापुढे जगाची कृषिव्यवस्था व्यापतील. त्यामुळे पीक संरक्षण क्षेत्रातील पद्धतीत मोठे बदल होतील, असे संकेत या वेळी ‘प्रसिजिन अॅग्रिकल्चर’चे प्रतिनिधी डॉ. केजी कुरियन थॉमस यांनी दिले. “कृषी क्षेत्राचा कितीही विस्तार झाला तरी जैविक खतांचा वापर यापुढे महत्त्वाचा राहील. कारण तोच शाश्वत कृषी व्यवस्थेचा पाया असेल,” असे अॅग्रिला क्रॉप सायन्सचे संचालक डॉ. अमन शर्मा यांनी या परिषदेत सांगितले.

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने जगातील कृषी, कीडनाशक निर्मिती उद्योग, कृषी रसायने व्यावसायिक, कृषी जैव व निविष्ठा क्षेत्रातील संलग्न उद्योगांना एकाच छत्राखाली आणण्याचा आमचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला आहे.
- प्रदीप दवे, अध्यक्ष, पीएमएफएआय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT