Women Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : महिलांमध्ये वाढतेय उद्योजकतेची आस

Business Woman : देशातील ६३ टक्के महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची आणि स्वावलंबी होण्याची आस असल्याचे निरीक्षण एका सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Team Agrowon

Women Survey : देशातील ६३ टक्के महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची आणि स्वावलंबी होण्याची आस असल्याचे निरीक्षण एका सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पेनियरबाय फिनटेक कंपनीने त्यांच्या रिटेल दालनात देशभरातील ५००० महिलांच्या आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण करून पेनियरबाय विमेन फायनान्शियल इंडेक्स (पीडब्ल्यूएफआय) अहवाल तयार केला आहे.

या सर्वेक्षणानुसार, ५५ टक्के महिलांना आर्थिक बाबींशी संबंधित विविध सरकारी योजना आणि उपक्रमांची माहिती असून, त्यांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. ६८ टक्के महिलांनी औपचारिक पद्धतीने कर्ज घेण्याची इच्छा व्यक्त करत वैद्यकीय खर्च, घरगुती देखभाल आणि मुलांचे शिक्षण किंवा शेतीविषयक गरजा या कामांसाठी वाजवी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.

ऑनलाइन कॉमर्स सुविधा (२४ टक्के) आणि ऑनलाइन मनोरंजन (१८ टक्के) वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. ९६ टक्के महिलांनी रेल्वेतिकीट आरक्षित करण्याची इच्छा व्यक्त केली.

९५ टक्के महिलांनी रोख पैसे काढण्यासाठी ‘एईपीएस’ला पसंती देत असल्याचे सांगितले. रोख पैशांना प्राधान्य असले, तरी आधार कार्डावर आधारित व्यवहार व यूपीआय क्यूआर कोडला पसंतीही वाढत आहे. साधारण १८-३० वर्षे वयोगटातील आणि ३१-४० वर्षे वयोगटातील महिला डिजिटल पातळीवर अधिक सक्षम आहेत.

तरीही ४१ टक्के महिलांनी फोनवर पेमेंटसाठी कोणतेही अॅप वापरलेले नाही. रोख पैसे काढणे, मोबाइल रिचार्ज व बिले भरणे या तीन सेवांचा सर्वाधिक वापर केला जातो. ७० टक्के महिलांकडे जनधन बचत खाते असून, त्याचा वापर प्रामुख्याने रोख पैसे काढण्यासाठी वापर केला जातो.

गुंतवणुकीच्या पर्यायांविषयी वाढती जागरूकता
महिलांमध्ये गुंतवणुकीची पर्यायी साधने, संपत्ती व्यवस्थापन व निर्मितीविषयी जागरूकता वाढत आहे.  बचतीचे प्रथम प्राधान्य मुलांच्या शिक्षणासाठी असून, त्यानंतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी यांना प्राधान्य आहे.

५४ टक्के महिलांचे प्राधान्य महिन्याला किमान ७५०-१००० रुपयांची बचत करण्यास आहे, तर २७ टक्के महिलांची दीर्घकालीन बचतीसाठी १५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक बचत करण्यास पसंती अाहे.

७१ टक्के महिलांचे प्राधान्य ३ ते ५ वर्षांच्या अल्पकालीन गुंतवणुकीस असून, गुंतवणूकविषयक निर्णयांसाठी ७४ टक्के महिला कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून असतात, तर ११ टक्के महिला आर्थिक सल्लागारांकडून मार्गदर्शन घेतात.

‘महिलांचा उद्योजकतेकडे असलेला कल स्वागतार्ह असून, ई- कॉमर्स, म्युच्युअल फंड अशा नव्या सेवांचा ग्रामीण भागातील वाढता वापर आश्वासक आहे, महिलांचा औपचारिक आर्थिक घडामोडींमधील सहभाग वाढत आहे.
— जायत्री दासगुप्ता,
सीएमओ, पेनियरबाय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT