Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : अप्रमाणित निविष्ठाप्रकरणी उपसंचालक करणार चौकशी

Agriculture Department : विस्तार विभागाकडून अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी राबविल्या जातात. त्यासाठी विविध योजना राबविताना निविष्ठा पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचा संशय आहे.

मनोज कापडे

Pune News : उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या अप्रमाणित निविष्ठांचा गुंता वाढल्याने कृषी आयुक्तालयाने चौकशीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उपसंचालक शिवकुमार सदाफुले यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विस्तार विभागाकडून अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी राबविल्या जातात. त्यासाठी विविध योजना राबविताना निविष्ठा पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचा संशय आहे.

नाशिकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने कृषी आयुक्तालयाला दोन महिन्यांपूर्वी पाठवलेल्या एका अहवालात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील पीक प्रात्यक्षिके घटकातील निविष्ठा अप्रमाणित असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. दोन वर्षांपूर्वी आयुक्तालयाने दिलेल्या सूचनेत ८४ हजार लिटर द्रवरूप निविष्ठा खरेदीस मान्यता दिली होती. त्यापोटी सरकारी तिजोरीतून साडेतीन कोटी रुपये दिले गेले. यातील किती निविष्ठा बोगस होत्या हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, जळगावच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने आयुक्तालयाला एक अहवाल पाठविला होता. ‘पाल येथील कृषी विज्ञान केंद्राने पावणे दोन कोटी रुपये किमतीच्या ३० हजार लिटर निविष्ठांचा पुरवठा केला. परंतु, चाळीसगावच्या तालुका कृषी अधिकाऱ्याला निविष्ठांचा तपासणी अहवाल देण्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा तपासणीची कार्यवाही सुरू आहे,’ असे या अहवालात म्हटले आहे. कृषी खात्याला स्वतःच्याच प्रयोगशाळेतून अहवाल मिळत नसल्याने या प्रकरणातील संशय वाढला आहे.

कृषी आयुक्तालयाने धुळे, नंदुरबार, नाशिक व जळगाव जिल्ह्यात झालेल्या पुरवठ्यांचेही अहवाल मागविले. यात काही जिल्ह्यात अप्रमाणित निविष्ठांचा पुरवठा झालेला असतानाही बिले अदा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या निविष्ठा स्वयंउत्पादित आहेत की नाही हेदेखील संबंधित अधिकाऱ्यांनी पाहिलेले नाही.

काही अधिकाऱ्यांनी निविष्ठा प्रमाणित असल्याचे नमुद केले आहे. “कृषी अधीक्षकांची कार्यालये व पुरवठादारांनी एकत्रितपणे हा घोळ घातलेला आहे. आयुक्तालयाकडे परस्परविरोधी अहवाल येत असल्याचे दिसत असल्यामुळे सहसंचालक सुनील बोरकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रत्यक्ष भेटीच्या सूचना

निविष्ठा घोटाळ्याबाबत उत्तर महाराष्ट्रात नेमके काय घडले आहे याची चौकशी केवळ आयुक्तालयातून न करता प्रत्यक्ष जिल्ह्यांना भेटी देण्याच्या सूचना उपसंचालक शिवकुमार सदाफुले यांना दिल्या आहेत. दरम्यान, या चौकशीवर काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या इतर भागात चालणारे निविष्ठा खरेदीचे काम चांगले आणि आमचे वाईट, असा भेदभाव आयुक्तालय करते आहे. चौकशी करायची असल्यास सर्व जिल्ह्यांची करा, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT