Girana Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Circulation : ‘गिरणे’चे आवर्तन आठ दिवसांत अखेरच्या भागात पोहोचणार

Water Update : खानदेशातील सर्वात मोठ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातून शुक्रवारी (ता.२४) नदीत टंचाई निवारणार्थ पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील सर्वात मोठ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातून शुक्रवारी (ता.२४) नदीत टंचाई निवारणार्थ पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. सकाळीच हे आवर्तन सुटले. दोन हजार क्सुसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. पण त्याचा अधिकचा लाभ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागास आहे. तसेच नाशिकमधील मालेगाव, नांदगाव शहरासह मालेगाव औद्योगिक वसाहतीसही या धरणातून पाणी दिले जाते. या धरणातून दरवर्षी पाच वेळेस नदीत टंचाई निवारणार्थ आवर्तन सोडण्याचे आदेश आहेत.

डिसेंबरपासून हे आवर्तन सोडले जातात. यंदा तीन वेळेस नदीत टंचाई दूर करण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. चौथे आवर्तन शुक्रवारी सकाळी सोडण्यात आले. या संबंधी चाळीसगाव, भडगाव, पाचोरा येथील पालिका आणि मालेगाव येथील औद्योगिक क्षेत्रातून मागणी आली होती.

चाळीसगाव, भडगाव, पाचोरा शहरास या धरणातून पिण्यासाठी पाणी दिले जाते. तसेच सुमारे १२० गावांच्या पाणी योजनांच्या स्रोतांचेही बळकटीकरण या धरणाच्या पाण्याने होते. मे महिन्यात उष्णता प्रचंड आहे. तापमान सतत वाढले. ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान अनेक भागांत होते. यामुळे पाणी योजनांचे जलस्रोत कमकुवत झाले. अनेक कूपनलिकांचे पाणी आटले.

शिवारास दिलासा मिळणार

या आवर्तनाने नदीकाठच्या शिवारातील विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होईल. तसेच पाणी पातळी टिकून राहील. यामुळे कापूस, भाजीपाला पिकांच्या शेतीला पाणी उपलब्ध होईल. टंचाई दूर होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गिरणाकाठच्या शिवारातील कूपनलिकांची जलपातळी सतत कमी होत होती. यामुळे शेतकऱ्यांकडूनही नदीत पाणी असावे, नदी काही दिवस प्रवाही राहावी, अशी मागणी करण्यात येत होती.

कानळदापर्यंत येणार पाणी

गिरणा धरणाचे पाणी नदीत फक्त जळगाव तालुक्यातील कानळदा गावापर्यंत पोहोचू दिले जाते. या गावापर्यंत पाणी आल्यानंतर आवर्तन बंद केले जाते. कानळदा गावापर्यंत पाणी येण्यास आणखी आठ दिवस लागतील. परंतु पाणी कानळदापर्यंत आल्यानंतर नदीत किमान तीन दिवस पाण्याचा प्रवाह असायला हवा, अशी मागणी नदीच्या शेवटच्या टोकात असलेल्या गावांमधील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

Desi Poultry Farming: अल्पभूधारक माळींना ठरला देशी कोंबडीपालनाचा आधार

Dairy Farming Success: शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायातून मिळवले आर्थिक स्थैर्य

SCROLL FOR NEXT