Water Scarcity : बोअरवेल आटल्या, विहिरी कोरड्या

Water Crisis : प्रतिवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या वाढू लागली आहे.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Mokhada News : प्रतिवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या वाढू लागली आहे. उन्हाच्या तडाख्याने तालुक्यातील बोअरवेल आटल्या, तर विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

पाण्याचा स्रोत नसल्याने नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. त्यांना प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईबाबत मोखाडा तालुका अतिसंवेदनशील आहे. येथे प्रतिवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारीत पाणीटंचाईला सुरुवात होते. मात्र, यावर्षी पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने डिसेंबरमध्येच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या वाढत आहे.

Water Crisis
Water Crisis : राज्यात ग्रामीण भागाच्या घशाला कोरड

मार्च सरताच टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या पन्नाशी पार झाली आहे. टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना सरकारकडून १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांची तहान भागवण्यासाठी १२ हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरच्या दररोज ६६ फेऱ्या केल्या जात आहेत. त्यामुळे २० हजार ६१२ नागरिकांची, तसेच सहा हजार ६९५ जनावरांची अशी एकूण २७ हजार ३०७ जणांची तहान भागवली जात असल्याचे सरकारी अहवालावरून समोर आले आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. येथे टॅंकरचा प्रस्ताव मोखाडा पंचायत समितीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठविला आहे.

Water Crisis
Water Crisis : पाणीटंचाईने घेतला माय-लेकीचा बळी

नाशिकमधून पाणीपुरवठा

टंचाईग्रस्त भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील पळसपाडा येथील वाघ प्रकल्पाचा पाझर तलाव आणि नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा धरण अधिग्रहण करण्यात आले आहे. येथून जलशुद्धिकरण करून टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या गाव-पाड्यांत टंचाई

गोळीचापाडा, धामोडी, स्वामीनगर, कुडवा, कुंडाचापाडा, तेलीऊंबरपाडा, वारलीवाडी, हट्टीपाडा, हेदवाडी, गवरचरीपाडा, ठवळपाडा, राजेवाडी, जांभुळवाडी, हुंड्याचीवाडी, धामणी, तुंगारवाडी, मडक्याचीमेट, कोलद्याचापाडा, चारणगाव, वाकीचापाडा, ठाकूरवाडी, गोमघर, वाशिंद, वाघवाडी आणि शेलमपाडा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com