Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : परभणी जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गहिरे

Water Crisis : अनेक तालुक्यांतील विहीर, तलाव जलस्रोत आटले आहेत. गावे, वाड्या, तांडे आदी लोकवस्त्यावरील पाणीटंचाईचे संकट अधिकच गहिरे झाले आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक तालुक्यांतील विहीर, तलाव जलस्रोत आटले आहेत. गावे, वाड्या, तांडे आदी लोकवस्त्यावरील पाणीटंचाईचे संकट अधिकच गहिरे झाले आहे.

पाणीटंचाई उद्‍भवलेल्या पाच तालुक्यांतील गावांमधील २० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ब्राह्मणगाव (ता. जिंतूर) येथे एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात गतवर्षी सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणीटंचाई उद्‍भवली आहे. बेसुमार उपसा, बाष्पीभवन आदी कारणांमुळे विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक लघू तलाव कोरडे पडले आहे.

मोठ्या तसेच मध्यम प्रकल्पांतील जिवंत पाणीसाठा संपुष्टात येत आहे. जिंतूर, गंगाखेड, पालम या तालुक्यांतील डोंगराळ भागासह परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई उद्‍भवली आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठला आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी अडचणी येत आहे. अनेक गावांतील ग्रामपंचायतीच्या योजनांचे पाणी मिळत नसल्यामुळे खासगी पाणीपुरवठा योजनांचे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

तापमानात वाढ होऊन पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यासोबत पाणीटंचाईची दाहकता अनेक गावांत दिसून येत आहे. विहिरी, बोअर आटल्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याची प्रश्न गंभीर झाला आहे.

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना अंतर्गत पूर्णा व पालम तालुक्यांतील प्रत्येकी १ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले. गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक ८ विहिरी, सोनपेठ तालुक्यातील ४ विहिरी, जिंतूर तालुक्यातील ६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

SCROLL FOR NEXT