Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Heavy Rain Crop Loss : सतत आठ दिवस पडत असलेल्या पावसाने पिकांची मोठी हानी झालेली आहे. कापूस, मका, बाजरी, तूर, कांदा, सोयाबीन वाया गेले.

Team Agrowon

Khandesh News : सतत आठ दिवस पडत असलेल्या पावसाने पिकांची मोठी हानी झालेली आहे. कापूस, मका, बाजरी, तूर, कांदा, सोयाबीन वाया गेले. कापसाला कोंब फुटल्यामुळे जवळपास ८० टक्के नुकसान झाले. त्यामुळे यंदा दुष्काळापेक्षाही गंभीर संकट शेतकऱ्यांवर आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.

परिसरात होत असलेला सतत पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. मे, जून ते ऑगस्ट या काळात लागवड झालेला कापूस शक्यतो दसरा, दिवाळीच्या काळात वेचणीला येतो. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी पाऊस जास्त असल्याने कापूस उत्पादनावर परिणाम झाले.

यंदा सुरवातीला झालेल्या पावसावर लागवड झाली; मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे कापसाला चांगलाच फटका बसला. वाढ खुंटली, बोंडेही कमी लागली. जे आले त्याची वेचणी सुरू करायला सुरवात होते तोपर्यंत आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाला.

त्यामुळे वेचणीला आलेली बोंडे सतत आठ दिवस भिजत राहिल्याने कापूस तर काळा पडलाच; पण बोंडालाच कोंब फुटले. न्याहळोदसह कापडणे, कौठळ, तामसवाडी, जापी शिरढाने, मोहाडी, सोनगीर, विश्वनाथ, सुकवड आदी परिसरात हजारो हेक्टरवरील पहिल्या वेचणीचा कापूस वाया गेला आहे.

कापसासोबत मका, बाजरी, सोयाबीनचेही खरिपात मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. दसरा ते दिवाळी या काळात बाजरी, सोयीबीनची काढणी केली जाते. यंदा मात्र पावसाने बाजरी, सोयाबीनचीही काढणी करता आली नाही.

त्यामुळे काढणी केलेल्या बाजरी, सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले आहे. बाजरीच्या कणसाला आणि सोयाबीनच्या शेंगानाही कोंब फुटले आहे. त्यामुळे यंदा पावसाने आलेली बहुतांश पिके वाया गेली असल्याने गत वर्षीपेक्षाही गंभीर स्थिती असल्याचे शेतकरी सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT