Cotton Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : कापूस उत्पादकांच्या ‘इकडे आड, तिकडे विहीर’

Cotton Producer : सहा हजारांवर दर; वेचणीचा खर्च मात्र वाढला

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः शेतीमाल उत्पादनाचा सर्वच पिकांचा खर्च मागील काही वर्षांत अव्वाच्या सव्वा झाला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे हक्काचे पीक असलेल्या कपाशी उत्पादकांना यंदा मजूरटंचाई व मजुरीचा दर मोठ्या प्रमाणात सतावत आहे.

वेचणीसाठी सरासरी १० ते १५ रुपयांपर्यंत प्रतिकिलो चुकारा द्यावा लागत आहे. तर बाजारात कापसाला साडेपाच ते साडे सहा हजारांदरम्यान खेडाखरेदीत दर दिला जात आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

कापूस उत्पादनाचा खर्च सरासरी एकरी ३० हजारांवर पोहोचला आहे. काही भागात अधिक फवारणी केली असेल, तर ३५ हजारांवर हा खर्च यंदा झाला. यापूर्वी बागायती पट्ट्यात कापसाचा हंगाम बऱ्यापैकी आटोपला, तर कोरडवाहू पट्ट्यात सध्या वेचणी जोरात आहे.

मजूर मिळत नसल्याने वेचणीला १० ते १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सातपुड्यातील आदिवासी कुटुंबे वेचणीच्या कामासाठी आणली आहेत. या वर्षी वेचणीसाठी १० ते १५ रुपयांपर्यंत प्रतिकिलोचा दर चुकवावा लागत आहे.

मध्यंतरी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनोत्तर पाऊस आल्यामुळे फुटलेला कापूस झाडांवर भिजला. हा कापूस वेचणीसाठी मोठी कसरत करावी लागली. वेचलेला कापूस वाळवावा लागला. यातील काही कापूस पिवळसर होऊन प्रतसुद्धा खालावली. हा कापूस बऱ्याच शेतकऱ्यांना ४००० रुपयांपासून विक्री करावा लागला.


आता कोरडवाहू क्षेत्रातील कपाशी वेचणी हंगाम जोरावर आहे. त्यामुळे मजूर मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ओढाताण करावी लागते आहे. बरेच शेतकरी इतरांपेक्षा अधिक दर देऊन मजुरांना आकर्षितही करीत आहेत. तरीही पुरेशे मजूर नसल्याने बिकट अवस्था झाली आहे. कोरडवाहू पट्ट्यात एकरी ५ क्विंटलपासून उत्पादकता येऊ शकेल, असा अंदाज आहे.

सध्याच्या बाजारभावाप्रमाणे उत्पादन व झालेल्या खर्चाचा विचार केला तर कापूस उत्पादकांना खर्च भागवणेही अवजड दिसत आहे. यंदा एकरी ३० हजारांपर्यंत खर्च झाला. पाच ते सात क्विंटल उत्पादन येत असेल तर सध्याच्या दराप्रमाणे ३५ ते ४० हजार होतात.

म्हणजेच वर्षभर मेहनत करून हातात पाच-सात हजार रुपये पडणेही मुश्कील झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मागील हंगामापर्यंत वेचणी ६ ते ८ रुपये प्रतिकिलो होती. यंदा १० ते १२ रुपये दर द्यावा लागतो आहे. काही शेतकऱ्यांना याहीपेक्षा अधिक वेचाई दर द्यावा लागत आहे. कापसाचा एकरी खर्च ३५ हजारांपर्यंत झाला आहे.
- अनुप साबळे-पाटील, कापूस उत्पादक, तरोडा, जि. अकोला

कापूस पिकाचे अर्थकारण
एकरी खर्च ३० ते ३५ हजार

.............
यंदाचे सरासरी उत्पादन
५ ते ७ क्विंटल
....
वेचणीचा दर
१० ते १५ रुपयांदरम्यान
....
मिळत असलेला दर ५५०० ते ६५०० रुपये क्विंटल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT