Maharashtra Assembly Election Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election 2024 : जागावाटपाचा घोळ कायम

Party Seat Allocation : महाविकास आघाडीने २५५ जागांचे वाटप केले असले, तरी गुरुवारी (ता. २४) सायंकाळपर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील यादीचा घोळ सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी उशिरा जाहीर केली.

Team Agrowon

Mumbai News : महाविकास आघाडीने २५५ जागांचे वाटप केले असले, तरी गुरुवारी (ता. २४) सायंकाळपर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील यादीचा घोळ सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी उशिरा जाहीर केली.

दरम्यान, महायुतीच्या उर्वरित १०६ जागा जाहीर केलेल्या नाहीत. त्यापैकी २५ जागांवर पेच सोडविण्यासाठी दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी राज्यातील नेत्यांची दीर्घकाळ चर्चा केली. मात्र तोही तिढा सायंकाळपर्यंत सुटला नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उशिरापर्यंत जाहीर झाली नसली, तरी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. मुस्लिम मतांना वळविण्यासाठी अजित पवार गटाने नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उमेदवारी रद्द केल्याचे समजते. तर लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे आम्हाला जास्त जागा हव्यात असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ४५ उमेदवार जाहीर

उमेदवार असे - इस्लामपूर : जयंत पाटील, काटोल : अनिल देशमुख, घनसावंगी : राजेश टोपे , कराड उत्तर : बाळासाहेब पाटील, इंदापूर : हर्षवर्धन पाटील, मुंब्रा - जितेंद्र आव्हाड, कोरेगाव : शशिकांत शिंदे, वसमत : जयप्रकाश दांडेगावकर, जळगाव ग्रामीण : गुलाबराव देवकर, राहुरी : प्राजक्त तनपुरे, शिरूर : अशोक पवार, शिराळा : मानसिंग नाईक, विक्रमगड : सुनील भुसारा, कर्जत जामखेड : रोहित पवार, अहमदपूर : विनायक पाटील, सिंदखेडराजा : राजेंद्र शिंगणे,

उदगीर : सुधाकर भालेराव, भोकरदन : चंद्रकांत दानवे, तुमसर : चरण वाघमारे, किनवट : प्रदीप नाईक, जिंतूर : विजय भांबळे, केज : पृथ्वीराज साठे, बेलापूर : संदीप नाईक, वडगाव शेरी : बापू पठारे, जामनेर : दिलीप खोडपे, मुक्ताई नगर : रोहिणी खडसे , मूर्तिजापूर : सम्राट डोंगरदिवे, नागपूर पूर्व : दुनेश्वर पेठे, तिरोडा : रविकांत भोपचे, अहेरी : भाग्यश्री अत्राम,

बदनापूर : रूपकुमार ऊर्फ बबलू चौधरी, मुरबाड : सुभाष पवार, घाटकोपर : राखी जाधव, आंबेगाव : देवदत्त निकम, बारामती : युगेंद्र पवार, कोपरगाव : संदीप वर्पे, शेवगाव : प्रताप ढाकणे,पारनरे : राणी लंके, आष्टी : महेबूब शेख, करमाळा : नारायण पाटील, सोलापूर शहर उत्तर : महेश कोठे, चिपळूण : प्रशांत यादव, कागल : समरजित घाटगे, तासगाव : रोहित आर. आर. पाटील, हडपसर : प्रशांत जगताप.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT