Ahilyanagar News : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता आपल्या मतदार संघाची जागा कोणाकडे असेल, उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली असल्याने नेमका उमेदवार कोण असेल याकडे आता लोकांचे लक्ष लागले आहेत. चार दिवसांत जागा आणि उमेदवार या बाबत चित्र स्पष्ट होईल असे दिसतेय.
जिल्ह्यात बारा विधानसभेचे मतदार संघ असून, २०१९ ला झालेल्या निवडणुकीत भाजपला ३, राष्ट्रवादीला ६, काँग्रेसला २, अपक्षाला एक जागा मिळाली होती. आता राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे. कोपरगाव, अकोले, अहिल्यानगर शहर येथील आमदार अजित पवार यांच्यासोबत म्हणजे महायुतीसोबत आहेत.
कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी, शरद पवार गटाकडे आहेत. आता महायुतीत कोपरगाव, अकोले, अहिल्यानगर शहर, पारनेर या जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवाटीला सुटणार असल्याची शक्यता आहे. कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी, अकोले, कोपरगाव, श्रीगोंदा शरद पवार गटाकडे राहतील. महायुती आणि महाविकास आघाडीत विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या अधिक आहे.
उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली असली तरी जागावाटपात जागा दुसऱ्याला जाऊ नये, आपला मतदार संघ आपल्या पक्षाला मिळावा यासाठी इच्छुकांच्या नेत्यांकडे चकरा सुरू आहेत. चार दिवसांत जागा आणि उमेदवार या बाबत चित्र स्पष्ट होईल असे दिसतेय. दरम्यान, बंडखोरी टाळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा सुटणार नसल्याचा अंदाज गृहीत धरून त्या त्या मतदार संघातील इच्छुकांची मनधरणी सुरू असल्याचे दिसत आहे.
२०१९ मधील आमदार
भाजप : शिर्डी- राधाकृष्ण विखे, श्रीगोंदा - बबनराव पाचपुते, शेवगाव - मोनिका राजळे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : कोपरगाव - आशुतोष काळे, अकोले - डॉ. किरण लहामटे, अहिल्यानगर शहर - संग्राम जगताप.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) : राहुरी - प्राजक्त तनपुरे, पारनेर - रिक्त (नीलेश लंके), कर्जत-जामखेड - रोहित पवार.
काँग्रेस : संगमनेर - बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर- लहू कानडे- काँग्रेस.
क्रांतिकारी शेतकरी पक्ष : नेवासा - शंकरराव गडाख.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.