Maharashtra Assembly Election : आदर्श आचारसंहिता पालनासाठी दक्ष राहावे

Code Of Conduct : आचार संहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडिओ पथके यांनी बस स्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनात रोख रक्कम वाहतुकीबाबत तपासणी करावी.
Haryana Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितापालनासाठी सर्व पथक प्रमुखांनी, सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कारवाई करावी, असे निर्देश आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी मंगळवारी (ता. २२) दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षामध्ये मंगळवारी जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदार संघनिहाय आचारसंहिता नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, महानगरपालिका अप्पर आयुक्त रणजित पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, खनिकर्म अधिकारी किशोर घोडके, श्रीमती उपासे यांच्यासह जिल्ह्यातील नऊ मतदार संघांतील आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

Haryana Assembly Elections 2024
Maharashtra Vidhansabha Election 2024 : सिंधुदुर्ग बागायतदार संघ लढविणार सावंतवाडीतून विधानसभा निवडणूक

या वेळी आचार संहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडिओ पथके यांनी बस स्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनात रोख रक्कम वाहतुकीबाबत तपासणी करावी. त्याचप्रमाणे संशयास्पद ठिकाणी अचानक क्षेत्रभेट देऊन तपासणी करावी. तपासणीची व्हिडिओग्राफी, लेखी नोंदी असणे आवश्यक आहे.

Haryana Assembly Elections 2024
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाविकास आघाडीचे प्रत्येकी ८५ जागांवर एकमत

तपासणी केल्यानंतर प्रत्येक दोन दिवसांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भेटीचे नियोजन मतदारसंघनिहाय करावे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी कपडे, भेटवस्तू किंवा इतर वस्तूचे वाटप करून मतदारांना प्रलोभन दिले जाऊ शकते. याबाबतही योग्य ती खबरदारी या कक्षामार्फत नियुक्त अधिकारी कर्मचारी घ्यावी.

विनापरवानगी पोस्टर, बॅनर याबाबत प्रचार होत असेल तर तत्काळ दखल घ्यावी. सी विजील या ॲपवर येणाऱ्या तक्रारींचीही तत्काळ दखल घेण्यात यावी. योग्य ते पुरावे जतन करावे. आचारसंहिता पालन करत असताना योग्य ती खबरदारी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी, विविध क्षेत्रांतील भेटीचे नियोजन, रोख रक्कम आढळून आल्यास करावयाचे कार्यवाही बाबत मार्गदर्शन या बैठकीमध्ये करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com