Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

Water Issue : जळगावातील गिरणा, धुळ्यातील पांझरा व नंदुरबारातील दरा, देहली प्रकल्पातील जलसाठ्यात या महिन्यात झपाट्याने घट झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत पोचला असून, गावोगावी टंचाई वाढली आहे. जळगावातील गिरणा, धुळ्यातील पांझरा व नंदुरबारातील दरा, देहली प्रकल्पातील जलसाठ्यात या महिन्यात झपाट्याने घट झाली आहे.

खानदेशातील एकूण जलसाठा २८ टक्क्यांपर्यंत आला आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु या प्रकल्पाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागांत अधिक आहे. २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे सिंचन या प्रकल्पातील जलसाठ्याच्या मदतीने करता येते.

परंतु या प्रकल्पात जलसाठा फक्त ५६ टक्के होता. कमी पावसाने गिरणा पट्ट्याला फटका बसला. चाळीसगावातील मन्याड प्रकल्पात शून्य टक्का साठा आहे. पाचोऱ्यातील बहुळा, गिरणा पट्ट्यातील बहुळा, अग्नावती, भोकरबारी, पारोळ्यातील बोरी, एरंडोलातील अंजनी प्रकल्पातही जेमतेम जलसाठा आहे.

गिरणा धरणातून रब्बीला पाणी देण्यात आलेच नाही. दोन वेळेस नदीत टंचाई निवारणार्थ पाणी देण्यात आले आहे. तसेच उद्योगांनाही पाणी दिले जात आहे. चाळीसगाव, भडगाव व पाचोरा शहरास पिण्यासाठी पाणी दिले जात आहे. यामुळे यातील जलसाठा २७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. खानदेशात काही प्रकल्पांत जलसाठा पावसाळ्यातही अल्प होता. काही प्रकल्प कोरडेठाक होते. यामुळे एकूण जलसाठा कमी होता. त्यात १०० टक्के भरलेल्या आणि अन्य प्रकल्पांतून पाणीउपसा सतत सुरू असल्याने एकूण जलसाठा चिंताजनक स्थितीत आहे.

१०० टक्के भरलेले प्रकल्प होताहेत रिकामे

जळगाव जिल्ह्यात जामनेरातील तोंडापूर, वाघूर, रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर, गारबर्डी, चोपड्यातील गूळ, भुसावळनजीकचा तापी नदीवरील हतनूर हेच प्रकल्प १०० टक्के भरले होते. धुळ्यातील पांझरा व अनेर, नंदुरबारातील दरा व देहली हे मध्यम प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते.

परंतु त्यातील जलसाठाही निम्मे घटला आहे. हतनूर प्रकल्पातून जळगावातील औद्योगिक वसाहत, भुसावळ शहर, भुसावळातील आयुध निर्माणी, दीपनगर औष्णीक वीजप्रकल्पास पाणीपुरवठा होतो. तसेच यावल, रावेर व चोपड्यातील रब्बीसही तीन वेळेस आवर्तन देण्यात आले आहे. त्यातील जलसाठा ३७ टक्क्यांखाली आहे. वाघूर प्रकल्पातूनही जळगाव शहर, जामनेर शहर, लहान उद्योग, जळगाव व भुसावळातील काही गावांतील रब्बीसही पाणी देण्यात आले आहे. यातील जलसाठाही ५० टक्क्यांखाली आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT