Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : ‘सिल्क, मिल्क’ ही संकल्पना शेतकऱ्यांच्या फायद्याची

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : ‘सिल्क, मिल्क’ ही संकल्पना जर शेतकऱ्यांनी अवलंबली तर याचा फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकतो, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या रेशीम संशोधन योजनाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या दत्तक गाव देवगाव, (ता. पैठण) येथील शेतकऱ्यांच्या तुती रेशीम शेतीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. लटपटे आणि कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर यांनी शनिवारी (ता. 5) भेट दिली. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना रेशीम उद्योगाविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, विषय विषयज्ज्ञ डॉ. बस्वराज पिसूरे, डॉ. संजूला भावर, प्रा. गीता यादव, प्रगतशील शेतकरी शहादेव ढाकणे, सदाशिव गीते, दीपक जोशी, सरपंच योगेश कोठुळे, जनार्धन गीते व गावातील रेशीम उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.

डॉ. लटपटे म्हणाले, की रेशीम शेतीत २०१८ पासून उझी माशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रण मिळवता येते. जैविक नियंत्रणासाठी निसोलायनक्स थायमस या उझी माशीवरील परोपजीवी किटकांचा वापर केल्यास प्रभावी नियंत्रण करता येते. हे परोपजीवी किटक रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. रेशीम उत्पादकाकडे पशुधन असणे गरजेचे आहे.

आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली ''सिल्क आणि मिल्क" ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यावेळी डॉ. नेहरकर यांनी ‘वनामकृवि’द्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी परिसरातील तुती लागवड आणि रेशीम संगोपनगृहास भेटी देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे शास्त्रज्ञाद्वारे निरासन करण्यात आले. यावेळी डॉ. लटपटे व डॉ. नेहरकर यांनी लिहिलेले ‘तुती, रेशीम उद्योग तंत्रज्ञान’ या पुस्तकाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले.

शक्यतो सप्टेंबर महिन्यात बॅच घेणे टाळा...

बऱ्याच भागात रेशीम कोश न बनणे (नॉन स्पिनिंग) ची समस्या आढळून आली आहे. यामागे कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक व खते यांचा जास्तीचा वापर हे कारण पुढे येत आहे. प्रतिवर्ष प्रति हेक्टरी २० टन शेणखत तसेच ८ टन गांडूळ खताचा वापर तुती लागवडीत करण्याची शिफारस आहे. यांचा वापर करत असताना एक वर्ष शेणखत, तर दुसऱ्या वर्षी गांडूळ खत याप्रमाणे आलटून पालटून ही खते जमिनीत द्यावीत.

जून व सप्टेंबरमध्ये दोन समान हफ्त्यात या निविष्ठांचा वापर जमिनीत करावा. प्रत्येक शेतकऱ्याने गांडूळखत प्रकल्प आपल्या शेतावर तयार करावा. तुती लागवडीसाठी पट्टा पद्धत फायदेशीर आढळून आलेले आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यामध्ये दिवस व रात्रीच्या तापमानात खूप मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून येते. याचा विपरीत परिणाम रेशीम शेतीवर होतो. याकरिता शक्यतो सप्टेंबर महिन्यात बॅच घेणे टाळावे. या खंडाचा पुढील बॅच चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी फायदा होतो, असे डॉ. लटपटे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT