Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Water Supply : पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्याचा पदभार पुन्हा सुनील कटकधोंड यांच्याकडे

Jal Jivan Mission : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सुनील कटकधोंड यांना यापूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार देण्यात आला होता.

Team Agrowon

Solapur News : जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडेच पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सुनील कटकधोंड यांना यापूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार देण्यात आला होता. जलजीवन मिशनचे काम मिशन मोडवर असताना तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्यावर निविदा प्रकरणात ठपका ठेवण्यात आला होता.

त्यावरून त्यांची बदली झाली. त्यामुळे त्यांचा पदभार कटकधोंड यांच्याकडे आला होता. जलजीवन मिशनच्या निविदेतील गैरव्यवहारप्रकरणी चौकशीत कटकधोंड यांचे नाव आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यांना या पदावरून तात्पुरते बाजूला केले होते.

त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कार्यकारी अभियंता पाटील व त्यानंतर गाडेकर यांची या पदावर नियुक्ती झाली. पाटील यांनी पदभार सोडल्यानंतर गाडेकर आले. गाडेकर यांनी ही महिनाभराच्या कामकाजानंतर पदभार सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे या पदाचा पदभार कोणाकडे द्यावयाचा असा प्रश्‍न होता, तेव्हा कटकधोंड यांच्याकडेच पुन्हा हा पदभार देण्याचा निर्णय आव्हाळे यांनी घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT